• Download App
    BJP responded to Aditya Thackerays criticism of Devendra Fadnavis government ''आदु बाळा, रक्तात असली इतकी बदमाशी करायची नसते...'' भाजपाचा आदित्य ठाकरेंवर पलटवार!

    ”आदु बाळा, रक्तात असली इतकी बदमाशी करायची नसते…” भाजपाचा आदित्य ठाकरेंवर पलटवार!

    ”नाहीतर शेतकर्‍यांना सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला देणारे आपले पिताश्री होतेच ना…” असंही भाजपाने म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपाच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धव  ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच सरस होते, हे माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतंय. असं सांगत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली.  त्यांच्या टीकेला आता भाजपाकडूनही चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. BJP responded to Aditya Thackerays criticism of Devendra Fadnavis government

    भाजपाने म्हटले आहे की, ”आदु बाळा, रक्तात असली इतकी बदमाशी करायची नसते. माहितीच्या अधिकारात काय विचारले? किती सामंजस्य करार झाले, त्यातून किती रोजगार अपेक्षिले गेले आणि त्याची आकडेवारी मांडून या राज्यातील सुजाण नागरिक अजीबात भुलणार नाही. आता आम्ही सांगतो, महाराष्ट्रप्रेमी कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण?”

    याचबरोबर ”महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एमओयूपैकी 23 टक्के कधी अंमलातच आलेले नाही, हाच दर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात इतिहासातील सर्वाधिक होता. संपूर्ण आकडेवारी समजून घ्या. – 2016 मेक इन इंडिया : एकूण एमओयू 338/गुंतवणूक : 3,66,214 कोटी – 2018 मॅग्नेटिक महाराष्ट्र : एकूण एमओयू 2437/गुंतवणूक : 5,45,121 कोटी – 2019 ते 2022 : एकूण एमओयू 99/गुंतवणूक : 1,93,704 कोटी – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2022 : एकूण एमओयू : 25/गुंतवणूक : 80,498 कोटी – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 : एकूण एमओयू : 19/गुंतवणूक : 1,37,666 कोटी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाशी तुम्ही स्पर्धा करुच शकत नाही.” असं महाराष्ट्र  भाजपाने सांगितलं आहे.

    याशिवाय ”महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक परकीय गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आली. आता तुमचे सरकार गेल्यावर पुन्हा महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला आहे. अपेक्षित रोजगाराची संख्या विचारुन काय साध्य कराल, आकडेवारी द्यायचीच असेल तर किती रोजगार दिले, ते विचारा. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. नाहीतर शेतकर्‍यांना सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला देणारे आपले पिताश्री होतेच ना…” असं म्हणत  भाजपाने आदित्य ठाकरेंना टोलाही लगावला आहे.

    आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? –

    ”उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत होतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं! प्रफुल्ल सारडा जी ह्यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतंय की भाजपाच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारच सरस होते! फडणवीस सरकारच्या च्या ६० महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या लघु व सुक्ष्म उद्योगांची स्थिती बिकट होती. पण आमचं मविआ चं सरकार येताच, अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत ह्याच उद्योगांमध्ये भरघोस अशी ३५% नी वाढ झाली. रोजगाराच्या संधीमध्येही ४२% नी वाढ झाली. आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करुन दाखवलं! महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारं सरकार जर गद्दारी करून पाडलं गेलं नसतं, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती. उद्धवसाहेबांची दूरदृष्टी, नैपुण्य आणि मविआतील सर्वच सहकाऱ्यांची साथ ह्या जोरावर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आले असते. पण आत्ताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल, कारण महाराष्ट्राच्या जनतेला पक्कं ठाऊक आहे, महाराष्ट्रप्रेमी कोण आहे आणि महाराष्ट्रद्रोही कोण आहे!”

    BJP responded to Aditya Thackerays criticism of Devendra Fadnavis government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस