• Download App
    सोलापुरातून कमळावर राम सातपुते, तर सुनील मेंढे आणि अशोक नेते यांनाही भाजपची तिकिटे!!BJP releases 5th list of candidates for the upcoming Lok Sabha elections

    सोलापुरातून कमळावर राम सातपुते, तर सुनील मेंढे आणि अशोक नेते यांनाही भाजपची तिकिटे!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपच्या पाचव्या हाय प्रोफाईल यादीत कंगना राणावत अरुण गोविंद आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष किरण कुमार रेड्डी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री यांची नावे आली असून त्यात महाराष्ट्रातून तीन नावांचा समावेश आहे. BJP releases 5th list of candidates for the upcoming Lok Sabha elections

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने सिद्धेश्वर स्वामी यांचे तिकीट कापून माळशिरसचे “फर्स्ट टाइम” आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत राम सातपुते यांच्यावर विश्वास टाकत त्यांना तिकीट दिले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे हिच्याशी राम सातपुते यांची टक्कर होईल.

    याखेरीज भंडारा गोंदियातून सुनील मेंढे, गडचिरोली चिमूर मधून अशोक नेते यांची तिकिटे भाजपने कायम ठेवली आहेत.

    सोलापुरातून खासदार सिद्धेश्वर स्वामी यांचे तिकीट कापले जाणार याची उघड चर्चा होती. त्यांच्या जात प्रमाणपत्राविषयी संशय निर्माण झाल्यानंतर त्यांना तिकीट देणे राजकीयदृष्ट्या धोक्याचे ठरणार होते. त्यामुळे भाजपने “सेफ गेम” करत तिथे त्यांचे तिकीट कापले. परंतु, त्यांच्या जागी नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता भाजपच्याही गोटात होती. मध्यंतरी दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे नावही भाजपमधून चर्चेत होते.

    परंतु, भाजपने माळशिरसचे फर्स्ट टाइम आमदार राम सातपुते यांच्यावर विश्वास टाकत त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यामुळे आता त्यांची टक्कर सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे हिच्याशी होणार आहे. विधानसभेत एकमेकांच्या विरोधात विरोधी बाकांवर बसणारे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे आता लोकसभेच्या मैदानात एकमेकांसमोर आले आहेत.

    BJP releases 5th list of candidates for the upcoming Lok Sabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य