प्रतिनिधी
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांनी युती केली आहे. ती निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. हा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला आहे, पण त्याचवेळी अंधेरी पोट निवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. BJP rejects Nana’s allegations of Pawar + Shelar alliance in MCA elections
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुंबईत कालपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली झाल्या. यात राज ठाकरे, शरद पवार यांनी स्वतः भाजपला आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी फक्त शरद पवार यांचे आभार मानणारे पत्रक काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे + देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांचा सिलसिला झाला. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप उमेदवार मुरजी पटेल अंधेरी पोटनिवडणूकीतून अर्ज मागे घेतील असे जाहीर केले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक म्हणजे पैशाच्या खजिन्याची निवडणूक. ती बिनविरोध करण्यासाठी कोण कोणाला भेटले आहे हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना केले होते. त्यांनी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या युतीकडे त्यांची नावे न घेता बोट दाखवले होते. या संदर्भात बावनकुळेंना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी नानांचे आरोप फेटाळले, तर राज ठाकरे आणि शरद पवार यांनी ज्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला दिला होता तोच हवाला त्यांनी दिला. 1980 अटलजींच्या काळापासून भाजपने अनेक असे निर्णय घेतले आहेत. यासाठी मी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे आणि देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांचे आभार मानतो, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
अंधेरी पोटनिवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर फडणवीस आणि शेलार यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. फडणवीसांचा निवडणूक बिनविरोध करण्याकडे कल होता, तर आशिष शेलार निवडणूक लढविण्यासाठी आग्रही होते असा दावा माध्यमांनी या बातम्यांमध्ये केला होता. प्रत्यक्षात नाना पटोले यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांची युती कशी झाली, याकडे बोट दाखवले आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवाराच्या माघारीची घोषणा केली आहे.
BJP rejects Nana’s allegations of Pawar + Shelar alliance in MCA elections
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
- अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??