नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या आणि छगन भुजबळांच्या राष्ट्रवादीची फरफट झाल्याचे चित्र नाशिक मध्ये बघायला मिळाले. भाजपने महायुतीत घ्यावे म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज धडपड करून पाहिली, पण त्यात त्यांना यश आले नाही.BJP rejected Ajit Pawar NCP in Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच 100 पारचा नारा दिला होता, पण त्यानंतर त्यांनी थोडी भूमिका बदलत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती करायची तयारी चालवली होती. या युतीच्या जागावाटपा संदर्भात त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा देखील केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपकडे किमान 50 जागा द्याव्यात, अशी मागणी केली. या मागणीला शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्त यांनी दुजोरा दिला. पण त्याचवेळी भाजपने शिवसेनेला सन्मानजनक जागा दिल्या नाहीत, तर स्वबळावर लढाईची इशारा देखील दिला. शिवसेना आणि भाजप यांची युती झाली, तर किमान 45 जागा मिळाल्याखेरीज शिवसेना भाजपबरोबर जाणार नाही, अशी राजकीय स्थिती निर्माण झाली.
– गिरीश महाजनांची भेट घ्यायचा प्रयत्न
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला. गिरीश महाजन हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये थांबले होते. तिथे त्यांच्या काही बैठका होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर आणि माजी खासदार समीर भुजबळ हे तिघे गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी त्या हॉटेलवर पोहोचले. पण गिरीश महाजन बैठकीत असल्याने ते ताबडतोब त्यांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना वेटिंग वर राहावे लागले. गिरीश महाजन बैठक संपवून बाहेर पडले, त्यावेळी सगळे नेते त्यांच्यासमोर गेले आणि महायुतीची चर्चा करायची मागणी केली. आम्ही सगळे आलो आहोत. आम्हाला 5 मिनिटे तरी वेळ द्या, अशी विनंती आमदार हिरामण खोसकर यांनी गिरीश महाजनांना केली. पण गिरीश महाजन त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता दुसऱ्या कार्यक्रमासाठी तिथून निघून गेले.
– भुजबळांच्या वर्चस्वाला पूर्ण धक्का
नाशिक मध्ये भाजपचे स्वबळ वाढते असताना मुळातच त्यांना राष्ट्रवादीची गरज नाही. एकेकाळी छगन भुजबळांचे वर्चस्व असणाऱ्या महापालिकेवर भाजपने वर्चस्व मिळवल्यानंतर पुन्हा भुजबळांच्या बरोबर जायची भाजपला गरज वाटत नाही. त्यातच अगदीच गरज असेल, तर एकनाथ शिंदेंचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे भाजप फार तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती करून निवडणूक लढवेल, पण अजित पवार आणि भुजबळांच्या राष्ट्रवादीला बिलकुल जवळ करण्याची शक्यता नाही म्हणूनच महाजन राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चाही न करता हॉटेलमधून निघून गेल्याचे दिसून आले.
BJP rejected Ajit Pawar NCP in Nashik
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले!!
- Imran Khan : तोशाखाना प्रकरण- इम्रान, बुशरा बीबीला 17 वर्षांची शिक्षा; ₹16.40 कोटींचा दंडही ठोठावला; माजी पाकिस्तानी PM 28 महिन्यांपासून तुरुंगात
- महाराष्ट्रात भाजपच नंबर 1; 129 नगराध्यक्ष, 3325 नगरसेवक निवडून आणून रेकॉर्ड!!
- देवाभाऊंच्या पक्षाचा वरून पहिला नंबर, तर शरद पवारांच्या पक्षाचा खालून पहिला नंबर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोशल मीडियावर सामसूम!!