विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार यांच्या दबावाला बळी पडू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवाब मालिकांवर कठोर कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, असे सांगत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली? की थेट ऑफर देऊन टाकली!!, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.BJP ready to stand with Shiv Sena for action on Nabab series
नबाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याबरोबर मनी लॉन्ड्रिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. महाविकास आघाडीत नवाब मलिक यांचे हे प्रकरण काट्याचा नायटा बनले आहे. अशा स्थितीत अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवाब मालिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी भाजप शिवसेनेबरोबर उभारायला तयार आहे, अशी ऑफर दिल्याचे मानण्यात येत आहे.
शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होऊ शकतो. अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, तर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काय अधिकार आहे? त्यांच्यावर थेट देशद्रोही दाऊद इब्राहिमला मदत केल्याचा आरोप आहे. नबाब मलिक यांची अटक ही राजकीय कारवाई नाही. देशद्रोहाशी संबंधित कारवाई आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या दबावाला बळी पडू नये. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवू नये. विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी नवाब मलिक यांच्या संदर्भात कठोर भूमिका मांडावी. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे असे शेलार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
त्यामुळे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात ही राजकीय पुनर्मांडणीची प्रक्रिया सुरू झाली आहे का?, अशी चर्चा या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दाऊद इब्राहिम, जावेद चिकणा यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने कारवाई साठी एफआयआर दाखल केला आहे. ती राजकीय कारवाई नाही. तर नवाब मलिक यांच्या वरची कारवाई कशी काय राजकीय ठरू शकते?, असा खोचक सवाल देखील अशिष शेलार यांनी केला आहे.
BJP ready to stand with Shiv Sena for action on Nabab series
महत्त्वाच्या बातम्या
- RUSSIA UKRAINE WAR : FIFA आणि UEFA चा रशियाला झटका ! आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित ; 2022 च्या विश्वचषकातून रशियाची हकालपट्टी
- LOVE STORY OF President : प्रेमकहाणी !जगाला प्रेमात पाडणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर जेव्हा पडले होते ओलेनांच्या प्रेमात !
- रशिया-युक्रेनमध्ये चर्चेच्या दुसऱ्या बैठकीकडे जगाचे लक्ष; पहिल्या बैठकीत तोडगा नाही
- सोन्यात गुंतवणूक करा कमी किंमतीत; सार्वभौम गोल्ड बाँड खरेदीची ग्राहकांना मोठी संधी; ४ मार्चपर्यंत मुदत