• Download App
    BJP power struggle Pawar  power in the sports sector suffers a blow!! भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला फटका!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला फटका!!

    Pawar

    नाशिक : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पवारांना आणि त्यांच्या अनुयायांना काही फायदा जरूर झाला, पण क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला मात्र कायमचा फटका बसला. पवारांची महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर एकहाती सत्ता होती, तिला भाजपने टप्प्याटप्प्याने सुरुंग लावला. क्रिकेट पासून कुस्तीपर्यंत वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्ष पवारच राहिले. शरद पवार अजित पवार रोहित पवारांनी वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद कायम आपल्या ताब्यात ठेवले.BJP power struggle Pawar  power in the sports sector suffers a blow!!

    काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला असताना क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या वर्चस्वाला कुठला धक्का लागला नाही. उलट काँग्रेसच्याच सत्तेच्या काळात पवारांचे क्रीडा क्षेत्रावर वर्चस्व वाढत राहिले.



    त्या उलट अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर पवारांच्या क्रीडा क्षेत्रातल्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. सुरुवातीला शरद पवारांच्या हातातली कुस्ती संघटना निसटली. त्यावर भाजपच्या नेत्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले.

    – अजितदादांना आणले वठणीवर

    त्यापाठोपाठ ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत भाजपने अजित पवारांना तडजोड करणे भाग पाडले. भाजपने तिथले अजित पवारांचे एकहाती वर्चस्व मोडून काढले. भाजपने अजित पवारांकडे ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष पद टिकवून ठेवले त्यात अडीच वर्षांनंतर ते अध्यक्षपद मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिले पाहिजे, अशी अट घातली. त्यामुळे अजित पवारांच्या एकतर्फी वर्चस्वाला धक्का बसला.

    केदार जाधवचा रोहित पवारांना दणका

    दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत क्रिकेटपटू केदार जाधव हा आमदार रोहित पवारांना नडला. रोहित पवारांनी मतदार यादीत आपल्या नातेवाईकांचा आणि समर्थकांचा भरणा केला होता रोहित पवारांचा तो‌ डाव केदार जाधवने हाणून पाडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला त्यांनी मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती मिळवली. त्यामुळे रोहित पवारांचा मतदार यादी घोटाळा सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आला. महापालिका निवडणुका नंतर एकतर रोहित पवारांना तडजोड करावी लागेल किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरचे आपले वर्चस्व कायमचे गमवावे लागेल.

    – भाजपचे दुय्यम नेतेच पवारांना झुंजवताहेत

    ही सगळी परिस्थिती भाजपने अजित पवारांना सत्तेच्या वळचणीला आणून ठेवल्यानंतर घडवून आणली. एरवी शरद पवारांसारख्या बड्या नेत्याला काँग्रेसचे मुख्यमंत्री पातळीवरचे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलवरचे नेते आव्हान देत असत. ते प्रत्येक वेळी यशस्वी होतच असतात असे नाही, पण काँग्रेसला मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलवरचे लोक पवारांना आव्हान देण्यासाठी मैदानात उतरवावे लागत असत. पण भाजपने मात्र आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना पवारांच्या विरोधात मैदानात उतरविले आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी पवारांना जेरीस आणले किंवा अनेक ठिकाणी नेस्तनाबूत केले.

    – अजितदादांना आव्हानच पेलेना

    अजित पवारांना पुणे महापालिकेत मुरलीधर मोहोळांशी सामना करावा लागतो आहे. निदान ते केंद्रात तरी राज्यमंत्री आहेत, पण पिंपरी – चिंचवड मध्ये तर अजित पवारांना त्यांचाच जुना पठ्ठा आमदार महेश लांडगे आव्हान देत आहे. ते सुद्धा अजित पवारांना पेलतत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून तर त्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मुक्काम ठोकावा लागला आहे. कारण भाजपचे बळकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोहोळ आणि लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत.

    BJP power struggle Pawar  power in the sports sector suffers a blow!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!

    विलासरावांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने, पण अजितदादांनी श्रेय दिले शरद पवारांना; पण ते सत्य किती??

    रवींद्र चव्हाणांची खेळी पडली तोकडी; अंबरनाथ मध्ये शिंदे सेनेनेच मारली बहुमताची बाजी!!