पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात स्थानिक भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. चंद्रपुरमधील राजुरा तालुक्यात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. राजुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून सोमनाथपूर वॉर्डातील रहिवासी असलेल्या लल्ली शेरगिलची हत्या करण्यासाठी हल्लेखोर जिल्हा मुख्यालयापासून २९ किमी अंतरावर असलेल्या राजुरा येथे आले होते. BJP office bearers wife killed in firing one injured in Chandrapur Two accused arrested
पोलिसांनी सांगितले की, शेरगिलला याची माहिती मिळताच तो आपाला मित्रा भाजपाच्या युवा शाखेचा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे याच्या घरात घुसला. यादरम्यान हल्लेखोरांनी शेरगिल यांना मारण्यासाठी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तेवढ्यात सचिन डोहे यांची पत्नी पूर्वा घरासमोरील अंगणात आली. तेवढ्यात पूर्वा यांच्या छातीत गोळी लागल्याने त्या जागेवरच कोसळल्या, तर शेरगिल यांच्या पाठीत गोळी लागली.
दोघांनाही राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तेथे पूर्वा यांना मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या शेरगिलला उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
BJP office bearers wife killed in firing one injured in Chandrapur Two accused arrested
- पोर्ट सुदान विमानतळावर प्रवासी विमान कोसळले, चार लष्करी जवानांसह नऊ जणांचा मृत्यू!
- अजितदादांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; भाजप नेत्यांचा इशारा; त्यानंतर सुनील तटकरेंचा चर्चेवर पडदा!!
- शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!
- नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!