प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात भाजपने तिसरे धक्का तंत्र वापरले आहे. सुरुवातीला भाजपची आमदारांची संख्या जास्त असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून धक्का दिला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावून धक्का दिला आणि आता विधानसभा अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत शिवसेना आणि राष्ट्रवादीतून फिरून आलेले राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देणे जाहीर करून तिसरा धक्का दिला आहे. BJP nominated rahul narvekar for maharashtra assembly speaker post
महाराष्ट्रात सत्तांतर घडल्यानंतर राज्यात भाजपा-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात अनपेक्षित मुख्यमंत्री पदाची माळ पडली. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची हुलकावणी दिली. त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. आता राज्यपालांनी नव्या सरकारला शनिवारी, 3 जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदासाठी भाजपा-शिंदे गट सरकार भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देणार आहे.
३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन
राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. असे असताना त्यांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत. सध्या ते विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले आहेत. भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत.
BJP nominated rahul narvekar for maharashtra assembly speaker post
महत्वाच्या बातम्या