shiv sena BJP Alliance : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शिवसेनेने भाजपसोबत जुळवून घेत पुन्हा युती करण्याची विनंती त्यांनी केली आहे. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धारण केला आहे. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले. BJP MP Girish Bapat says shiv sena BJP Alliance will be on Hindutwa
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शिवसेनेने भाजपसोबत जुळवून घेत पुन्हा युती करण्याची विनंती त्यांनी केली आहे. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धारण केला आहे. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले.
खा. बापट म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. महापालिकेत शिवसेना-भाजप युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असंही ते म्हणाले.
भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले. भविष्यात युती होऊ शकते. राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असंही बापट यावेळी म्हणाले.
BJP MP Girish Bapat says shiv sena BJP Alliance will be on Hindutwa
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक
- काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायला फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलेलं – हसन मुश्रीफ
- पुण्यामध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध; १५७ केंद्रांवर सुविधा ; १०० डोस वितरित
- नानांच्या “दोन दाढीवाल्यांचे शटर बंद करायचेय” टीकेला भातखळकरांचे “दाढीचे खुंट वाढवून फिरणारा पाहा”ने प्रत्युत्तर