वृत्तसंस्था
गोंदिया : मी भंगारवाला, चोर नाही; बँकही बुडवलेली नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. बेनामी संपत्ती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्याला ते उत्तर देताना बोलत होते. Bjp mohit kamboj guardian minister and minority development minister nawab malik anonymous assets revealed
भाजपच्या मोहित कंबोज यांनी गोंदियाचे पालकमंत्री व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. त्यावर मलिक यांनी कंबोज यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी भंगारवाला आहे. चोर नाही. बँक बुडवून मी कोट्यवधी खाल्ले नाही. माझ्या कुटुंबीयांची संपत्ती कुठे कुठे ते तुम्ही शोधाच,मी घाबरत नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युतर दिले.
मलिक म्हणाले, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी कोणाकोणाचे संबंध होते व हॉटेलचे कोण मालक आहेत, हे तपासा. मग हॉटेलमधून ड्रग्ज क्रुझवर कसे गेले ते माहीत पडेल. आम्ही आता नाव घ्यायला सुरुवात केली आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. एनसीबीने कारवाईची जी छायाचित्रे समोर आणली ती घटनास्थळावरील नसून एनसीबी कार्यालयातील आहेत. समीर वानखेडे खोट्या कारवाया करत होते. एनसीबीने स्वत:ची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांना यामध्ये फसविले जात होते. समीर वानखेडे यांच्यासोबत कासिफ खान हासुद्धा या कटात सहभागी होता. त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खान याच्याविरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असेही मलिक यांनी सांगितले.
Bjp mohit kamboj guardian minister and minority development minister nawab malik anonymous assets revealed
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द