• Download App
    BJP MLC Gopichand Padalkar targets Sanjay Raut over Belgam BJP win

    बेळगावात विजयी मराठी माणूसच झालाय; फक्त पेंग्विनचे विकास मॉडेल त्याने नाकारलेय; पडळकरांनी सटकावले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला त्यामुळे मराठी माणूस पराभूत झाल्याचा आव शिवसेनेने आणला आहे. त्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फटकारले आहे. BJP MLC Gopichand Padalkar targets Sanjay Raut over Belgam BJP win

    संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक उमेदवार मराठी माणसे वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.



    महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे, काश्मीरमध्ये कलम ३७० चे  गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खात आहात. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुश करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठी जणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकेशाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवी पताका उतरवली. त्यांचाच शाप आणि तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे, असे आमदार पडळकर म्हणाले.

    तुमचा पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटींच्या ‘पेंग्विन‘ विकासाचे मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की, तुम्ही निर्बंध लादता व इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता, अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटला आहे आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उघडा पडला आहे, असा हल्ला पडळकर यांनी केला आहे.

    BJP MLC Gopichand Padalkar targets Sanjay Raut over Belgam BJP win

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!