विशेष प्रतिनिधी
मुबंई : पुणे महानगरपालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार सुनील कांबळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. फोनवरील संभाषणाची ही ऑडियो क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये भाजप आमदार अतिशय गलिच्छ भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर या क्लिपने धुमाकूळ घातला आहे.
Bjp mla uses abusive words for women officer in pune, audio clip goes viral
पुणे महानगरपालिकेच्या कामाच्या लॉकिंग बिलाबद्दल हे आमदार त्या महिला अधिकाऱ्याला फोनवर अतिशय वाईट भाषेमध्ये बोलत होते. ‘तुमच्याकडून काम होणार नसतील तर तसं सांगा, पुढे काय करायचं ते माझा मी पाहतो’ अश्या ह्या धमकीवजा भाषेत बोलतानाचा व्हिडीओ सध्या संबंधित आमदारास वादाच्या भोवऱ्यात खेचून आणतोय.
आमने-सामने: ‘वसुली’ आणि ‘नवा वसुली मंत्री’ यांच्यावरून चित्रा वाघ व रूपाली चाकणकर यांची शाब्दिक चकमक
या सर्व मॅटरवर आपले मत व्यक्त करताना रुपाली चाकणकर यांनी भाजप आणि आमदार सुनील कांबळे यांना निशाणा साधत एक ट्विट केले आहे. ‘आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केलेल्या त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहेत.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सुनील कांबळे यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची जाहीरपणे माफी मागावी अशी मागणीही रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे.
Bjp mla uses abusive words for women officer in pune, audio clip goes viral
महत्त्वाच्या बातम्या
- देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास
- CYCLONE GULAB : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! चक्रीवादळ गुलाबमुळे भारतीय रेल्वेने 27 सप्टेंबरपर्यंत अनेक गाड्या केल्या रद्द ; पाहा संपूर्ण यादी…
- एअरबस कडून भारत ५६ लष्करी वाहतूक विमाने खरेदी करणार, तब्बल २० हजार कोटींचा करार
- विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवासात आता १०० रुपयांची वाढ