• Download App
    ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने...’; नितेश राणेंनी साधला निशाणा! BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray and Aditya Thackeray

    ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!

    ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’ असं देखील नितेश राणेंनी म्हणत एकप्रकारे सूचक इशारा दिला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेलच्या भितीने भाजपात गेले असल्याचं खळबळजनक विधान केलं. ज्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray and Aditya Thackeray

    ‘’जेलच्या भितीने शिंदे भाजप बरोबर गेले… मग penguin आणि UT ने सालियानच्या केसच्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच!!! ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’’ असं आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    ‘’भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावेळी शिंदे मातोश्रीवर रडले होते.’’, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना नितेश राणे वेळोवेळी लक्ष्य करत आले आहेत. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी बोलत राहावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. असं काही दिवसांपूर्वी नितेश राणे म्हणाले होते.

    BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray and Aditya Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !