बाबरी मशीद तोडत असताना उद्धव ठाकरेंचं नेमकं योगदान काय? याबद्दल महाराष्ट्राला कधीतरी माहिती द्या, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या अयोध्या राममंदिर आंदोलनाच्या मुद्य्यावरून भाजपा विरुद्ध ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून विविध विधानं केली जात आहेत. भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना(ठाकरे गट) बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेत जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray
नितेश राणे म्हणाले, ‘’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाबद्दल आणि रामजन्मभूमी बद्दलचं त्यांचं योगदान, हे मोठंच आहे ते कोणीच नाकारू शकत नाही आणि कोणी नाकारलंही नाही. पण मला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, की तुम्ही बाळासाहेबांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात. तुमच्या योगदानाबद्दल कधीतरी बोला. तुम्ही नेमकं मातोश्रीच्या कोणत्या बिळात तेव्हा जाऊन लपलेलात?, कुठला कॅमेरा साफ करत बसलेलात? बाबरी मशीद तोडत असताना उद्धव ठाकरेंचं नेमकं योगदान काय? याबद्दल महाराष्ट्राला कधीतरी माहिती द्या.’’
याशिवाय ‘’साधं २६/७ला जेव्हा मुंबई तुंबलेली तेव्हा हेच उद्धव ठाकरे बाळासाहेबांना एकटे सोडून ताज प्रेसिंडेटमध्ये बांद्रात जाऊन कुटुंबाबरोबर लपलेले आणि मोठी बाबरीबद्दलची भाषा करतात. कधीतरी महाराष्ट्राला कळू दे की उद्धव ठाकरे, हा किती घाबरट माणूस आहे. म्हणून बाळासाहेबांचं योगदानाबाबत बोलण्याअगोदर स्वत:च्या योगदानाबद्दल महाराष्ट्राला थोडी माहिती द्या, एवढंच उद्धव ठाकरेंना मी आव्हान करेन.’’ असंही नितेश राणे म्हणाले.
बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांचा हात नव्हता. ज्या दिवशी बाबरी मशीद पडली, तेव्हा तिथे बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिक उपस्थित नव्हते, असे वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रचंड संताप उफाळला असून त्यांनी उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेत चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे.
बाबरी मशीद पाडल्याच्या दिवशीचा सर्व घटनाक्रम उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत विशद करून सांगितला आहे. बाबरी मशीद ज्यावेळी दिवशी पडली, त्यादिवशी सायंकाळी मी बाळासाहेबांच्या खोलीत गेलो आणि बाबरी पडल्याची माहिती त्यांना सांगितली. त्यावेळी त्यांचे पहिले उद्गार असे होते, की बाबरी शिवसैनिकांनी पडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांचे हेच उद्गार नंतर जगप्रसिद्ध झाले. त्यांच्यावर लखनऊ कोर्टात केस चालली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती वगैरे नेत्यांवरही ही केस चालली. पण आता चंद्रकांतदादा पाटील बाबरी पाडण्यात शिवसैनिक नव्हते, असा दावा करत आहेत त्याबद्दल त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अथवा त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हाकलून दिले पाहिजे आणि चंद्रकांत दादांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची हिंमत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या