• Download App
    मुक्ताताई टिळक : लोकमान्य टिळकांच्या "श्रीशाय जनतात्मने" परंपरेच्या पाईक!!bjp mla muktatai tilak passed away

    मुक्ताताई टिळक : लोकमान्य टिळकांच्या “श्रीशाय जनतात्मने” परंपरेच्या पाईक!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : “श्रीशाय जनतात्मने” म्हणजे जे काही आहे, ते सगळे जनतेसाठी आणि जनता रुपी परमेश्वरासाठी अर्पण या परंपरेच्या पाईक असणाऱ्या भाजपा आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाले आहे. लोकमान्य टिळक यांच्या पणत सूनबाई आणि जयंतराव टिळक यांच्या चुलत सुनबाई ही त्यांची सुरुवातीची ओळख होती. bjp mla muktatai tilak passed away

    लोकमान्य गीतारहस्य हा ग्रंथ “श्रीशाय जनतात्मने” असे म्हणून जनतेला अर्पण केला होता. लोकमान्य टिळकांचा जनसेवेचा हा वारसा त्यांचे पुत्र श्रीधरपंत टिळक आणि त्यांचे पुत्र जयंतराव टिळक यांनी अनुक्रमाने पुढे चालविला. जयंतराव टिळक यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदापर्यंत राजकारण गाजवले. त्यांचा हा राजकीय वारसा मुक्ताताई टिळक यांनी पुढे नेला. त्या पुण्याच्या महापौर झाल्या आणि नंतर भाजपच्या आमदार झाल्या. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आघाडीवर राहिल्या.


    विधान परिषद : शिवसेनेच्या सुहास कांदेंचे मत भाजपने घालवून दाखवले; जगताप, टिळकांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप!!


    पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ताताई टिळक गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ५७ वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी 3.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव उद्या, शुक्रवारी सकाळी 9.00 ते 11.00 यावेळेत केसरी वाडा राहत्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यांचा अंत्यविधी वैकुंठ स्मशामभूमी येथे 11.00 वाजेनंतर करण्यात येणार आहे.

    पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ताताई टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर अॅम्ब्युलन्सने नेण्यात आले होते. मुक्ताताई टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात शहराचे महापौरपद भूषविले होते. त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू गोपूनाना टिळक यांच्या सख्या सुनबाई, तर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक यांच्या चुलत सूनबाई होत्या.

    राजकीय कारकीर्द

    आमदार होण्यापूर्वी मुक्ताताई टिळक पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक १५ च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर २०१७ साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. महापौर असतानाच २०१९ साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ताताई टिळक यांचे पती शैलेश टिळक भाजपमध्ये सक्रिय आहेत.

    शिक्षण

    पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ताताई टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. मानसशास्त्र विषयातून एम. ए. झालेल्या त्या पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. शिवाय, मुक्ताताईंनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले होते.

    bjp mla muktatai tilak passed away

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!