प्रतिनिधी
मुंबई – बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची संस्कृती आहे. या शर्यतीमुळे शेतकरी बैलांचे पालन पोषण करतो. त्यांना सकस आहार देतो. त्यांचा जीवापाड सांभाळ करतो. या बैलांमुळे खऱ्या अर्थाने गोवंश वाढतो. मात्र, या बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्यामुळे राज्यात कालपर्यंत ८७ लाख बैल होते, त्यांची मागील दीड – दोन वर्षांत ५७ लाख इतकी संख्या झाली आहे. ३० लाख बैल कत्तलखान्यांकडे गेले, असा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. BJP MLA gopichand padalkar pitched for bulluck cart race
जर असेच हे चालू राहिले, तर १-२ वर्षांत बैल चित्रात बघावा लागेल. गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली जात आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गोपीचंद पडळकर बोलत होते.
पडळकर म्हणाले, की बैलगाडा शर्यत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकार योग्य बाजू मांडत नाही. या विषयावर ३-३ वर्षे तारखा पडत नाहीत. याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे. बैलगाडा शर्यत हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे. मी स्वतः शेतकरी आहे. माझ्या घरी गाई, बैल हा गोवंश आहे. म्हणून आता आम्ही या विषयात उतरलो आहे.
शेतकरी बैलांना मुलाप्रमाणे जपतो, त्यांना सकस आहार देऊन वाढवतो. ही बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने ग्रामीण संस्कृती आहे. ही शर्यत ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे आम्ही या विषयावर राज्य सरकारच्या विरोधात उतरलो आहोत. सरकारने त्वरित यात लक्ष घालावे. तामिळनाडूमध्ये बैलांच्या शर्यतींना परवानगी आहे. कर्नाटकातही याला परवानगी आहे. कारण त्याविषयावर त्या राज्यांनी कायदा बनवला आणि टिकवला आहे. म्हणून २० ऑगस्ट रोजी माझ्या गावात आंदोलन होणार आहे, त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी बैल घेऊन यावे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.
BJP MLA gopichand padalkar pitched for bulluck cart race
महत्त्वाच्या बातम्या
- काबूलमधील 257 अफगाणी शीख आणि हिंदू कुटुंबांना वाचवा, वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनचे गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन
- पीएम मोदी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्याची शक्यता, 76व्या वार्षिक अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात
- Independence Day : देशभरातील 1,380 पोलिसांना शौर्य आणि सेवा पदके, जम्मू -काश्मीर पोलिसांना सर्वात जास्त 275 पदके
- जम्मू -काश्मिरात स्वातंत्र्यदिनी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैशच्या चार दहशतवाद्यांना अटक
- स्वातंत्र्यदिनी SBIची भेट : गृहकर्जावर प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही, बँक देतेय 6.70% व्याजदराने कर्ज