• Download App
    बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता ; पडळकरांची ठाकरे - पवार सरकारवर टीका Bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government over recruitment

    बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता ; पडळकरांची ठाकरे – पवार सरकारवर टीका

    वृत्तसंस्था

    मुंबई : ”बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता.” अशी जोरदार टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे – पवार सरकारवर केली. Bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government over recruitment

    आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ठाकरे सरकारवर पदभरती मुद्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, “ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरला जीव गमवावा लागला होता. त्यांनतर सरकारने ना नियुक्त्या दिल्या ना पदभरती केली.

    #आघाडी_सरकारमध्ये अनेक विभागात ११,३५१ पद रिक्त असताना मात्र यांनी #MPSC कडे फक्त ४,२६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता
    — Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 25, 2021

    आतातर वेगवेगळ्या २० विभागात ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, लोकसेवा आयोगाकडं केवळ ४ हजार २६४ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी केली आहे. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात विविध श्रेणीतील २५०० च्या आसपास पदं रिक्त होती. मात्र अमित देशमुख यांनीपद भरतीची मागणी सरकारकडे केली नाही. हीच परिस्थिती अनेक खात्यांची आहे. प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही, असे पडळकर म्हणाले.

    Bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government over recruitment

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!