Thursday, 8 May 2025
  • Download App
    विनामास्क फिरणाऱ्या भाजपा आमदरालाच पोलिसांनी ठोठावला २०० रुपयांचा दंड। BJP MLA fined Rs 200 for walking around without mask

    विनामास्क फिरणाऱ्या भाजपा आमदरालाच पोलिसांनी ठोठावला २०० रुपयांचा दंड

    राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. BJP MLA fined Rs 200 for walking around without mask


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यावर ओमायक्रॉनचे संकट वाढत असून दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. जनतेला या विषणुपसून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा हे लोकप्रतिनिधींनी सांगायचं तर त्यांनाच याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

    राज्यातील अनेक नेत्यांच्या बैठका ,सभा किंवा विविध सोहळे होत असतात.दरम्यान ठिकाणी नेते विनामास्क फिरताना दिसून येतात. याचदरम्यान, मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क भिरणाऱ्या भाजपच्या आमदारवर पोलिसांनी कारवाई केली आहे.चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर ही कारवाई केली आहे.

    मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असता असं सांगून ठोठावलेला दंड भरला.आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे.

    BJP MLA fined Rs 200 for walking around without mask

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस