विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेले दोन वर्षे रस्त्यांची कामे निधीअभावी रखडली असल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी रस्त्यावरील खड्ड्यांत बसून उपहासात्मक होमहवन आंदोलन केले. BJP mla did andolan for road
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या २७ गावांतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने रस्त्यावर सद्यस्थितीत वाहन चालविणे तसेच पायी चालणेही अवघड झाले आहे.
मंजूर रस्त्यांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली. ही स्थगिती उठवून १० रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी आमदारांनी आशेळे-माणेरे रस्त्यावरील खड्ड्यात होमहवन करीत सद्भाावना यज्ञ केला.
कल्याण पूर्व मतदारसंघातील १८ रस्त्यांच्या कामास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. रस्त्यांच्या कामाचा डीपीआर तयार होऊनही राज्य सरकारने या कामांना स्थगिती दिली.
BJP mla did andolan for road
महत्त्वाच्या बातम्या
- जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा
- आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही
- बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या
- सोनियांसाठी “नवे डॉ. मनमोहन सिंग” बनण्याचा ममतांचा प्रयत्न…??
- मुंबई महानगर प्रदेशात बीएस -३ वाहनांना पूर्ण बंदी घाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीची शिफारस