रस्ते खड्यात, मग २१ हजार कोटी कुणाच्या खिशात? असा प्रश्नही विचारला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या कामातील कथित रस्ते घोटाळ्यावरून पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. कॅगच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray and Aditya Thackeray over the Mumbai Municipal Corporation scam
आशिष शेलार म्हणाले, ‘’२५ वर्षात मुंबई महापालिकेने रस्त्यांवर २१ हजार कोटी खर्च केले मग रस्ते खड्यात कसे गेले? रस्ते खड्यात, मग २१ हजार कोटी कुणाच्या खिशात? खिसेकापू कोण? दरोडेखोर कोण? लुटेरे कोण? मुंबईकर हो! तुमच्या प्रश्नांची उत्तरे CAG च्या अहवालात उघड. पालिकेचे कारभारी त्यांचीच ही वाटमारी!’’
याशिवाय ‘’CAG ने रस्त्यांच्या फक्त ५६ कामांचा अभ्यास केला यापैकी ५१ कामे कुठल्याही सर्वेक्षण न करता करण्यात आली. ५४.५३ कोटीची कामे निविदा न मागवता देण्यात आली. गंभीर बाब म्हणजे दोनच ठेकेदारांना ही १८ कामे देण्यात आली. संगणीकृत अहवालात हस्ताक्षरात नोंदी झाल्या सब गोलमाल.‘’ असं शेलार म्हणाले आहेत.
याचबरोबर ‘’आता जेव्हा राष्ट्रीय पातळीवरील कंपन्या मुंबईचे रस्ते तयार करीत आहेत, तेव्हा आदित्य ठाकरे चिडले? ….का? कंत्राटदारांचे रँकेट तोडले म्हणून? म्हणे.. मुंबईत एवढी कामे कशाला? सर्वे न करता कामे करण्यात येत आहेत. याच याच चोरांच्या उलट्या बोंबा CAG ने उघड्या पाडल्या. तीन वर्षांतील केवळ ५६ कामांमध्ये एवढा गोलमाल, तर मग गेल्या १० वर्षांत केवढा मोठा घपला? काँग्रेसंने तर कोळसा खाल्ला, इथे तथाकथित वाघांचा तर तिजोरीवर डल्ला! हे पहा मुंबईकर हो, तुमचे हे कैवारी कट, कमिशनसाठी कसायापेक्षा निर्दयी!’’ असं म्हणत शेलारांनी टीका केली आहे.
BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray and Aditya Thackeray over the Mumbai Municipal Corporation scam
महत्वाच्या बातम्या
- Video : अमृतपाल सिंगने जारी केला व्हिडिओ , म्हणाला – ‘मला अटक करण्याचा हेतू असता तर…’
- राहुल गांधीचे लोकसभा सदस्यत्व रद्द प्रकरणावर नितीश कुमारांचे मौन; प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा, म्हणाले
- iCloud : मोदी पायउतार झाल्यावर भाजपचे भ्रष्ट नेते तुरुंगात, केजरीवालांची दिल्ली विधानसभेत आगपाखड; पण नेमके “रहस्य” काय??
- महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!