“त्यांचे” पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उध्दवस्त करणारे राजकारण ओळखा, असंही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उद्यापासून(१७जुलै) पासून ‘एक सही भविष्यासाठी’ हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर निशाणा साधला आहे. BJP MLA Ashish Shelar criticizes Thackeray group and opponents
आशिष शेलार म्हणतात, ‘’गिफ्ट सिटीचे मुंबईला मिळालेले गिफ्ट “त्यांनी” घालवले, भाजपाने ते परत मिळवले. बुलेट ट्रेनला “त्यांनी” विरोध केला, भाजपाने आपला संकल्प कायम ठेवला. मुंबई-दिल्ली कॉरिडॉरला “त्यांनी” विरोध केला भाजपाने विकासाचा मार्ग नाही सोडला. भाजपाने “त्यांच्या” विरोधाला न जुमानता कोस्टल रोडचा आपला संकल्प प्रत्यक्षात उतरवला. मुंबईकरांच्या मेट्रोलाही “त्यांचा” विरोध होताच, पण भाजपाने मेट्रो रुळावर आणलीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला “आयआयएम” दिली प्रत्येक वेळी विरोध करणारे “ते” कपाळ करंटे त्यातही शिंकतील.’’
याचबरोबर ‘’म्हणून तमाम मुंबईकर हो, “त्यांचे” पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उध्दवस्त करणारे राजकारण ओळखा आणि चला मुंबईला भरभरून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत विकासाची एक वाट चालू या! माझ्या तरुण मित्रांनो एका तुमच्या सहीत तुमचे भविष्य रेखाटू या! आम्ही फक्त मागतोय तुमच्याकडे एक सही भविष्यासाठी!!’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.
‘’मुंबईमध्ये विद्यार्थ्यांसाठी IIM सुरू करण्याचा निर्णय तसेच देशातील तरुणांसाठी मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती मुंबईमधील महाविद्यालयीन युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १७ जुलैपासून ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान भारतीय जनता युवा मोर्चा सुरू करणार.’’ असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
BJP MLA Ashish Shelar criticizes Thackeray group and opponents
महत्वाच्या बातम्या
- शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या संघर्षात काँग्रेसला लाभ; भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष!!
- ‘’बिहारसाठी काहीतरी चांगले करा, दुसऱ्यांना दोष देत राहिल्यास …’’ प्रशांत किशोर यांचा तेजस्वी यादवांवर निशाणा!
- नाशिक मध्ये मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन
- आता लॉटरी पद्धत नाही, तर मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे आणि ड्रीप सिस्टीम; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय