• Download App
    BJP leaders must show the stuff against Ajit Pawar अजितदादा आणि भाजपच्या आरोप - प्रत्यारोपांनी फडणवीस सरकारला आणली काँग्रेस

    अजितदादा आणि भाजपच्या आरोप – प्रत्यारोपांनी फडणवीस सरकारला आणली काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा!! Party with a difference कुठेच दिसेना!!

    Ajit Pawar

    महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप – प्रत्यारोपांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा!!, “पार्टी विथ अ डिफरन्स” कुठेच दिसेना!!, अशी अवस्था येऊन ठेपली.BJP leaders must show the stuff against Ajit Pawar

    ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याच्या 70 हजार कोटींचे आरोप आणि राज्य सहकारी बँक खरवडून खाल्ल्याचा आरोप आहे त्या अजित पवारांना पिंपरी चिंचवड महापालिकेतली भाजपची “राक्षसी भूक” दिसली. गेल्या 5 – 7 वर्षांत पिंपरी महापालिकेत झालेला भ्रष्टाचार दिसला. त्यामुळे त्यांनी भर पत्रकार परिषदेत भाजपचे वाभाडे काढले. अजित पवारांच्या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपवर आरोप करण्यापूर्वी अजित पवारांनी आपल्या गिरेबानमध्ये झाकून बघावे. आम्ही आरोप करायला लागलो तर अजित पवारांची जास्त अडचण होईल. अजित पवारांना आपल्यात घेताना पुन्हा विचार करा असा सल्ला आपण देवेंद्र फडणवीस यांना दिला होता, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.



    तर आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका. कारण मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद पण आमच्याकडेच आहे, असा इशारा चंद्रकांतदादा पाटलांनी दिला.

    काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा

    अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपामुळे देवेंद्र फडणवीस सरकारला जुन्या काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा आली. कारण काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांचे असेच वाभाडे काढत होते. अजित पवार काँग्रेसच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांना जुमानत नव्हते. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांपुढे ते “दादागिरी” करत होते. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना संख्याबळाच्या अभावी अजित पवारांची दादागिरी सहन करणे भाग होते, ते गप्प बसून कारभार रेट होते. पण म्हणून तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या केंद्राच्या राजकारणात कसलेल्या नेत्याला सोनिया गांधींनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले काम चोख बजाविले होते. त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांचे सगळे घोटाळे बाहेर काढले होते त्याचाच तर मोठा राजकीय फायदा भाजपला त्यावेळी झाला होता. या राजकीय फायद्याचा लाभ उठवून भाजप सरकारने त्याच वेळी अजित पवारांच्या नाकात दम आणायला हवा होता.

    – नुसत्या भाषणबाजीने भागणार नाही

    पण भाजपने स्वतःच्या सत्तेसाठी गरज नसताना ज्या अजित पवारांना सत्तेच्या वळचणीला आणून बसविले. त्यांची भाजप वर आरोप करायची हिंमत झालीच कशी??, हा खरा सवाल आहे आणि त्याचे उत्तर भाजपने वेळीच अजितदादांना वेसण घातली नाही किंवा लगाम घातला नाही, यात आहे. भाजप वर आरोप करताना अजितदादांनी भाजपच्या नेत्यांना हलक्यात घेतले. कारण भाजपच्या नेत्यांनीच स्वतःचे राजकीय वजन कमी करून घेतले. भाजपच्या नेत्यांनी जर योग्य वेळी कठोर कृती आणि कारवाई करून अजित पवार आणि त्यांच्या चेलाचपाट्यांना लगाम घातला असता, तर अजित पवारांची भाजपवर दुगाण्या झोडण्याची हिंमतच झाली नसती. पण भाजपने अजित पवारांच्या विरोधात कठोर कृती आणि कारवाई केली नाही म्हणून भाजपच्याच नेत्यांना ठोकायचे अजितदादांची हिंमत झाली. ती नुसती रवींद्र चव्हाण किंवा चंद्रकांतदादा पाटलांच्या भाषणांनी किंवा इशाऱ्यांनी शमणार नाही किंवा थांबणार नाही.

    – ओळख टिकवायची असेल, तर…

    तशी तर अजूनही वेळ गेलेली नाही. आता तर पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवारांचे हात दगडाखाली अडकलेत. अजितदादांना ठोकून काढायची मोठी संधी भाजपच्या नेत्यांना हातात आयती गवसली आहे. नुसती भाषणबाजी करून अजितदादांसारखा रट्ट नेता वठणीवर येणार नसतो, हे वेळीच ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या नाकात वेसण घातली पाहिजे. तिथे उगाच अदानी – भाजप, अदानी – पवार आपले संबंध जोडून वेळ वाया घालवता कामा नये. भाजपला आपली “पार्टी विथ अ डिफरन्स” ही ओळख टिकवायची असेल, तर अजित पवार आणि त्यांच्या चेलाचपाट्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी लागेल अन्यथा ती ओळख विसरावी लागेल.

    BJP leaders must show the stuff against Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसच्या डोक्याला ताप!!

    काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊदच्या नादी लागले म्हणून त्यांचे वाटोळे झाले; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

    अनोळखी मुलगा हिंदू मुलीला भुलवू शकतोच कसा??; मोहन भागवतांनी Love Jihad रोखण्यासाठी मांडली त्रिसूत्री!!