• Download App
    भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईच्या रुग्णालयात दाखल BJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai

    भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईच्या रुग्णालयात दाखल

    हुसैन सध्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल आहेत.

    विशेष प्रतिनिधी

     मुंबई : भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांना मंगळवारी (२६ सप्टेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. BJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai

    लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हुसैन सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत.

    हुसैन यांना याआधी ऑगस्टमध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.

    कोण आहेत शाहनवाज हुसैन? –

    भाजप नेते शाहनवाज हुसेन यांचा जन्म 12 डिसेंबर 1968 रोजी बिहारमधील सुपौल येथे झाला. सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. हुसेन हे नितीशकुमार आणि एनडीए सरकारमध्ये उद्योगमंत्री होते, पण नंतर सरकार पडले.

    BJP leader Shahnawaz Hussain suffered cardiac arrest and was admitted to Lilavati Hospital in Mumbai

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस