महाराष्ट्रातील मंदिरे न उघडल्याबद्दल भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम म्हणाले की, राज्य सरकार दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट उघडण्यास सशर्त मान्यता देऊ शकते, तर मंदिरे का उघडली जाऊ शकत नाहीत. राम कदमांनी इशारा दिला की, जर सरकारने मंगळवारपूर्वी मंदिर उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर ते सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जातील. सरकार त्यांना रोखू शकणार नाही. bjp leader ram kadam Warns Thackeray Govt Over Temple Opening Issue
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील मंदिरे न उघडल्याबद्दल भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम म्हणाले की, राज्य सरकार दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट उघडण्यास सशर्त मान्यता देऊ शकते, तर मंदिरे का उघडली जाऊ शकत नाहीत. राम कदमांनी इशारा दिला की, जर सरकारने मंगळवारपूर्वी मंदिर उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर ते सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जातील. सरकार त्यांना रोखू शकणार नाही.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, राज्यात उघडण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्तावित केलेल्या शाळा-कॉलेजवर बालरोग टास्क फोर्स, जनरल टास्क फोर्स, सीएम आणि शिक्षणमंत्र्यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल. त्याचवेळी, महाराष्ट्र आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की अत्यावश्यक सेवांशी संबंधित कर्मचारी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील, जर त्यांनी 14 दिवसांपूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील.
हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यास मान्यता
लसीशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून 500 रुपये दंड आकारला जाईल. त्याच वेळी, IPCच्या कलम 1860 अंतर्गतदेखील कारवाई केली जाऊ शकते. महाराष्ट्र सरकारने हॉटेल्स, रेस्तराँ व बार यांना क्षमतेच्या 50 टक्के उघडण्यास मंजुरी दिली आहे. ते रात्री 10 पर्यंत उघडता येतील. त्याच वेळी प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या लोकांना मास्क घालणे आवश्यक असेल. महाराष्ट्र सरकारनेही कोविड प्रोटोकॉलवर विशेष भर दिला आहे.
bjp leader ram kadam Warns Thackeray Govt Over Temple Opening Issue
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध