Maratha Reservation Issue : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना भाजपतर्फे राज्यभरात एल्गार पुकारण्यात आले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही नेते आदळआपट करत आहेत, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. BJP Leader Praveen Darekar Criticizes CM Uddhav Thackeray Over Maratha Reservation Issue
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना भाजपतर्फे राज्यभरात एल्गार पुकारण्यात आले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही नेते आदळआपट करत आहेत, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.
दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचं राजकारण करत आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. आताचा संघर्ष ही तर केवळ ठिणगी आहे, त्याचं वणव्यात कधी रूपांतर होईल, ते कळणारही नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढावा, असे दरेकरांनी म्हटलं.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी सहभाग नोंदवला. पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. फडणवीसांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून ते आरक्षण न्यायालयात टिकवलं. मराठा आरक्षणाचा कायदा करून तोही त्यांनी उच्च न्यायालयात टिकवला. मात्र, महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात ते टिकवता आलं नसल्याची टीका दरेकरांनी केली.
BJP Leader Praveen Darekar Criticizes CM Uddhav Thackeray Over Maratha Reservation Issue
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा; खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’, पडळकरांचा हल्लाबोल
- पॉझिटिव्ह न्यूज : या भारतीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हुंडा घेणे महागात पडणार, मागणी केल्यास जाणार नोकरी
- ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना लिपलॉक पडले महागात, कोविड नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपानंतर राजीनामा
- India Corona Updates : दोन दिवसांनंतर पुन्हा 50 हजारांच्या पुढे कोरोना रुग्णंसख्या, रिकव्हरी रेट वाढून 96.75% वर
- RBIची आमदार, खासदारांना नागरी बँकांचे संचालक होण्यास बंदी; शरद पवार काय म्हणाले, जाणून घ्या!