BJP Leader ChandraShekhar Bawankule : भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही, तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना गावागावांत फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये दिला. BJP Leader ChandraShekhar Bawankule Criticizes Shiv Sena In Amrawati District
विशेष प्रतिनिधी
अमरावती : भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही, तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना गावागावांत फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये दिला.
ईंट का जवाब पत्थर से देंगे
नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलाच राडा झाला. जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला व जाळण्याचा प्रयत्न केला. यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नसून ईट का जवाब पत्थर से देंगे, असा इशाराही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
धान घोटाळ्याची सीबीआय तक्रार
या महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात एक हजार कोटींचा धान खरेदी घोटाळा अधिकाऱ्यासमक्ष झाला आहे. या घोटाळ्याची सीबीआयकडे तक्रार केली, अशी माहितीसुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून तातडीने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यांनी केली आहे.
‘वर्षा’ बंगल्यावर राज्यभरातून पत्र जणार
बावनकुळे म्हणाले की, ज्या मुख्यमंत्र्याला देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही, मग महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या हिताचे रक्षण, युवकांच्या भावना, देशाच्या भावना त्यांनी तोडल्या आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर जेवढी जागा आहे त्या जागेवर मावतील तेवढे पत्र संपूर्ण महाराष्ट्रातून भाजप युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे सांगितलं. याची सुरुवातदेखील अमरावती येथील राजापेठच्या पोस्ट बॉक्समध्ये पत्र टाकून करण्यात आली.
BJP Leader ChandraShekhar Bawankule Criticizes Shiv Sena In Amrawati District
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साहेब, गांजाची शेती करण्याची परवानगी द्या’, सोलापुरातील शेतकऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आलेल्या अर्जाने खळबळ
- Nusrat Jahan : तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांना पुत्ररत्न, ‘पती’ निखिल जैन तीन महिन्यांपूर्वी नाकारले होते स्वतचे मूल
- ‘सेना- भाजपच्या भांडणात दोन कोल्ह्यांची मजा’, सदाभाऊ खोत यांची काँग्रेस, राष्ट्रवादीवर कडाडून टीका
- Justice BV Nagarathna Profile : २०२७ मध्ये देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनणार बी. व्ही. नागरत्ना, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्व काही…
- मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा