‘’… तूफान तो आएगा ही!’’ म्हणत अमित शाह यांचे केले आहे वर्णन, पाहा नेमकं काय म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट होणार असल्याच्या बातम्या समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ही टिप्पणी केली आहे. BJP leader Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray
प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘’जेव्हा हिंदुत्वादी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत होते. त्यावेळी आई भवानीचं दार उघड बाये दार उघड… हे हिंदुत्वाचं गाणं ते गात होते. आज जेव्हा हिंदुत्व सोडलं, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मतांच्या बेगडीसाठी दार खटखटाव भाई दार खटखटाव. असं कधी केजरीवाल, कधी तेजस्वी यादव, कधी टीआरएस, या सगळ्या दरवाज्यांवर जावं लागत आहे. तसंच राहुल गांधींच्या दरवाज्यावर जावं लागत आहे. ही परिस्थिती हिंदुत्व सोडलं, भाजपाला सोडलं तर दारोदारी फिरण्याची उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची झाली आहे.‘’
याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत येणार आहेत, या पार्श्वभूमीवरही आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘’अमित शाह म्हणजे तुफान आणि तुफानासमोर आपण तग धरू शकणार नाहीत, म्हणून तुफान येण्याअगोदर जे बीळ किंवा वेगवेगळ्या जागी लपणारे छोटे प्राणी असतात ते आवाज करतात. ते लपणारे छोटेछोटे प्राणी आता आवाज करत आहेत, परंतु तुफान तर येणारचं.‘’ असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
BJP leader Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!