BJP Leader Ashish Shelar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली आहे. शेलार म्हणाले की, छगन भुजबळ, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे ओबीसींचे नेते असल्याचं फक्त भासवत आहेत. हे तिन्ही नेते महाविकास आघाडीत एक भूमिका घेतात आणि बाहेर वेगळी घेतात. हे तिघे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार आहेत, अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे. BJP Leader Ashish Shelar Criticizes Aghadi Govt Bhujbal, Patole and Wadettivar Over OBC Reservation Issue
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली आहे. शेलार म्हणाले की, छगन भुजबळ, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे ओबीसींचे नेते असल्याचं फक्त भासवत आहेत. हे तिन्ही नेते महाविकास आघाडीत एक भूमिका घेतात आणि बाहेर वेगळी घेतात. हे तिघे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार आहेत, अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरचा दौरा केला. त्यानंतर नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आज आंदोलनाची घोषणा केली आहे. छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे ओबीसींचे नेते असल्याचं केवळ भासवत आहेत. आघाडीत हे नेते वेगळी भूमिका घेतात आणि बाहेर जनतेसमोर वेगळी भूमिका घेत असल्याचं ते म्हणाले. आरक्षण न टिकवणे हे आघाडीचं पाप आहे. भुजबळ, पटोले आणि वडेट्टीवारांनी त्यात हेराफेरी केली आहे. हे तिघे नेते हेराफेरी सिनेमातील कलाकार असल्याची खोचक टोला त्यांनी लगावला.
‘याचिका दाखल करणारा पटोलेंच्या जवळचा!’
आरक्षणाला आव्हान देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. विकास गवळी यांनी ही याचिका दाखल केली. ते काँग्रेस आमदारांचे सुपुत्र आहेत. तर याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एकजण नाना पटोले यांच्या जवळचा आहे, असा दावा करतानाच फडणवीस सरकारने काढलेला जीआर रद्द का केला? याचं उत्तर भुजबळ, पटोले आणि वडेट्टीवारांनी द्यावं, असंही शेलारांनी म्हटलं आहे.
मागासवर्ग आयोगासाठी 15 महिने का लागले?
राज्य सरकारला आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग स्थापन करण्याकरिता 15 महिने का लागले? या 15 महिन्यांत सरकारने न्यायालयात वेळकाढूपणा केला. इम्पिरिकल डाटा केंद्राने देण्याचा विषय आहे का? वडेट्टीवार यांचा आरक्षणाचा अभ्यास नाही. खोटे पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचंही शेलार म्हणाले.
BJP Leader Ashish Shelar Criticizes Aghadi Govt Bhujbal, Patole and Wadettivar Over OBC Reservation Issue
महत्त्वाच्या बातम्या
- जात प्रमाणपत्र हायकोर्टातून रद्द झाल्यानंतर नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयात धाव
- फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यातील 10 महापालिका, 20 नगर परिषदांच्या निवडणुकीची शक्यता
- बुलेट ट्रेनसाठी मुंबई-हैदराबाद व्हाया औरंगाबाद, नांदेड, जालना मार्ग प्रस्तावित करा; अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्
- बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांकडून महिला कर्मचाऱ्यांवरही लाठीमार
- यामुळे होत नाहीत इंधनाचे दर कमी… करून ठेवलं यूपीएनं, निस्तरतंय मोदी सरकार! वाचा सविस्तर- ऑइल बाँड अन् १.३० लाख कोटींच्या थकबाकीविषयी