विशेष प्रतिनिधी
मुंबई / नागपूर : महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे. त्यामुळे विधानसभेच्या सर्वाधिक जागा भाजपच लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला आज सुनावले. BJP is the biggest party BJP will contest the most seats in the Legislative Assembly
लोकसभा निवडणुकीतले महाराष्ट्रातले फक्त मतदान पार पडले आहे. मतमोजणी अजून व्हायची आहे. कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या मिळणार आणि तो पक्ष किती ताकदवान होणार??, हे अजून ठरायचे आहे, तरी देखील बाशिंग बांधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीला महायुतीतल्या 80 – 90 जागांची मागणी केली. आपल्या आकड्यांचे पत्ते अजितदादांच्या राष्ट्रवादीने वेळेआधीच खोलले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपच मोठा पक्ष असल्याचे सुनावण्याची संधी मिळाली. त्या संधीचा फडणवीस यांनी आज पुरेपूर लाभ उठविला.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पक्षात अस्वस्थता पसरली. ही अस्वस्थता छगन भुजबळांनी गरवारे क्लब मधल्या चिंतन बैठकीत बोलून दाखवली. राष्ट्रवादीला महायुतीतून 80 ते 90 जागा मिळाल्याच पाहिजेत. 40 – 50 जागांवर आपण समाधान मानणार नाही, अशी दमबाजी भुजबळ यांनी केली. अजितदादांनी त्यावर फारसे आक्रमक भाष्य केले नाही, पण आपला पक्ष जागा मागण्यात मागे राहणार नाही, हे त्यांनी सूचित केले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या या आक्रमक मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्टाईलने सौम्य भाषेत पण ठामपणे उत्तर दिले. महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये भाजप हाच सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विधानसभेच्या सर्वाधिक जागा भाजपच लढवणार आहे, पण इतरांनाही सन्मानजनक जागा देऊ, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. भुजबळांच्या वक्तव्याच्या निमित्ताने फडणवीसांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावण्याची संधी मिळाली. तिचा लाभ फडणवीसांनी नागपूर विमानतळावर पुरेपूर उठावला.
BJP is the biggest party BJP will contest the most seats in the Legislative Assembly
महत्वाच्या बातम्या
- सावरकर जयंती दिनी अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग!!
- वर्क फ्रॉम होम ऐकलं होतं, वर्क फ्रॉम जेल पहिल्यांदाच पाहिलं, राजनाथ सिंग यांचा केजरीवालांना टोला!!
- १ जूनपासून बदलणार ‘हे’ ५ नियम ; जाणून घ्या, तुमच्या खिशावर किती परिणाम होणार? नियमांचे उल्लंघन झाले तर किती भरावा लागणार दंड
- नवी दिल्लीत भीषण दुर्घटना! बेबी डे केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत सात बालकांचा मृत्यू