• Download App
    महाराष्ट्रभर २०००० सभांचा धडाका उडवत भाजपचा ठाकरे - पवार सरकारविरुद्ध एल्गार!!BJP is holding 20,000 rallies across Maharashtra

    महाराष्ट्रभर २०,००० सभांचा धडाका उडवत भाजपचा ठाकरे – पवार सरकारविरुद्ध एल्गार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, ड्रग्जचे समर्थन, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी राज्यभर तब्बल 20 हजार सभांचा धडाका उडवत भाजप ठाकरे – पवार सरकारविरुद्ध एल्गार पुकारणार आहे. भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याची माहिती दिली आहे.BJP is holding 20,000 rallies across Maharashtra

    अमरावती, नांदेड आणि मालेगावच्या दंगलीची मास्टरमाईंड रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

    भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत एक ठराव मांडण्यात आला. राज्यातील विविध घटकांवर महाविकास आघाडीने कसा अन्याय केला आहे, हे स्पष्ट करणारा राजकीय ठराव मांडण्यात आला.


    BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत


    बलात्कार, ड्रग्ज, भ्रष्टाचार, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी पक्षातर्फे राज्यभर सभा घेण्यात येतील. तसंच डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करतील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

    एसटी कामगारांच्या संपाला कार्यकारिणीनै पाठिंबा दिला. भाजपा नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि अन्य सुविधा देणे शक्य आहे व त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक बोजा सहन केला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

    त्यांनी सांगितले की, त्रिपुरात मशीद पाडण्याची घटना घडली नाही तरीही अफवेच्या आधारे मालेगाव, नांदेड, अमरावतीत षडयंत्र रचून दंगल घडविण्यात आली. 400 जणांच्या मोर्चाला परवानगी असताना 15000 ते 40000 हजार लोक रस्त्यावर आले. या दंगलीत रझा अकादमीचा हात आहे. पण असा अन्याय हिंदू समाज सहन करणार नाही. सरकारने हे हल्ले थांबविले नाहीत तर लोकांना संघटित होऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सरकार रोखू शकत नाही.

    BJP is holding 20,000 rallies across Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!