• Download App
    भाजप 2024 निवडणुकीत सिंगल इंजिनवर धावणार; देवेंद्र फडणवीस यांचे मनसे युतीवर सूचक विधान । BJP in 2024 elections Will run on single engine : Devendra Fadnvis

    भाजप 2024 निवडणुकीत सिंगल इंजिनवर धावणार; देवेंद्र फडणवीस यांचे मनसे युतीवर सूचक विधान

    पुणे : मेट्रोला जसं डबल इंजिनाची आवश्यकता नाही. त्या प्रमाणे 2024 च्या निवडणुकीत आम्ही सिंगल इंजिनवरच येणार आहे, असे भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. BJP in 2024 elections Will run on single engine : Devendra Fadnvis

    पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा फडणवीस यांनी घेतला. त्या नंतर ते पत्रकार परिषदेत मनसेच्या आगामी युतीबाबत बोलत होते. मेट्रोच्या प्रगतीचे कौतुक करताना ते म्हणाले, अतिशय वेगाने काम केल आहे. ट्रायल रन वरून श्रेय वादाचा विषय नाही. त्याचं सरकार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या हस्ते ट्रायल रनचे उद्घाटन झाले.

    हा रखडलेला प्रकल्प मी मुख्यमंत्री असताना मार्गी लागला याचा मला आनंद आहे. ठाकरेंची पुढची पिढी राजकारणात येत आहे चांगली गोष्ट आहे. परंपरेनं चालत आलेल्या नेतृत्वाने अनुभव घेतला पाहिजे.

    पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच होईल. त्याला कोणी हरकत घेणार नाही. आता एकूण कामाच्या 60 टक्के काम पूर्ण झाले.

    • भाजपची 2024 मध्ये ‘एकला चलो रे’ भूमिका
    • मेट्रोच्या वेगवान कामाबद्दल महामेट्रोचे कौतुक
    • महामेट्रोकडून आतापर्यंत 60 टक्के काम पूर्ण
    • ट्रायल रनवरून श्रेय वादाचा विषय नाही
    • मेट्रोचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार
    • तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाचे स्वागत

    BJP in 2024 elections Will run on single engine : Devendra Fadnvis

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस