नाशिक : शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजप मधला प्रवेश पक्षाच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी सुकर केला. पण त्याच वेळी शिस्तीच्या पक्षात राहून पुढची वाटचाल खडतर असल्याची “गोड” शब्दांमध्ये जाणीव देखील करून दिली. जुना इतिहास विसरा. आता बडगुजर यांना भाजपच्या नितीनियमान प्रमाणे काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यातच बरेच between the lines आले.
शिवसेनेच्या ठाकरे गटात किंवा अगदी मूळ शिवसेनेत सुधाकर बडगुजर ज्या पद्धतीने “स्वयंकेंद्रित” राजकारणाची वाटचाल करीत होते, त्या पद्धतीने भाजपमध्ये आल्यानंतर एवढी “स्वयंकेंद्रित” राजकारणाची वाटचाल बडगुजर यांना करता येणार नाही, याची “व्यवस्था” प्रदेश पातळीवरून आणि नाशिक शहर पातळीवरून होण्याची दाट शक्यता आहे. कारण मूळातच शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यपद्धतीमध्ये मूलभूत फरक आणि भेद आहेत. शिवसेनेमध्ये आधी ठाकरेंचे “चालायचे”. आता एकनाथ शिंदेंचे “चालते”. त्यापलीकडे फारसे कोणाचे “चालवून” घेतले जात नाही, पण स्थानिक पातळीवर एकदा एखाद्या नेत्याने रेटून स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित केले तर शिवसेनेमध्ये त्याला हात देखील लावला जायचा नाही सुधाकर बडगुजर यांच्याबाबतीत त्यांनी हे खरे करून दाखविले होते.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांपासून अलग झाल्यानंतर बडगुजर यांनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा एकहाती तोलला होता. त्यांनी आपल्या पद्धतीने स्वतःचे नेतृत्व शिवसेनेत रेटून मोठे केले होते. त्यात कुणी दुखावले किंवा सुखावले, तर त्याची फारशी फिकीर केली नव्हती. भाजप आणि मनसे बरोबर लढताना त्यांनी आक्रमकता कायम ठेवली होती. महापालिकेत स्वतःचे स्वतंत्र “इंटरेस्ट” निर्माण केले. त्यामुळे बडगुजर यांची शिवसेनेत मोठी चलती होती.
कार्यशैलीत बदल आवश्यक
पण आता शिवसेनेतून बाहेर पडून सुधाकर बडगुजर भाजप सारख्या संघटनात्मक बांधणीला महत्त्व देणाऱ्या पक्षात आलेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेत केली तशी रेटून राजकीय वाटचाल करता येणे कठीण आहे. स्थानिक आमदारांचा विरोध डावलून भाजपच्या प्रदेश नेत्यांनी बडगुजर यांना प्रवेश जरूर दिला असेल, त्यासाठी “वाल्याचा वाल्मिकी”, “जुना इतिहास विसरा”, वगैरे बाताही केल्या असतील. पण स्थानिक पातळीवर सुधाकर बडगुजर यांना एकट्याने निर्णय घेऊ देणे हे भाजपमध्ये कदापी होण्याची शक्यता नाही. बडगुजर यांना भाजपच्या पक्ष शिस्तीत राहून काम करावे लागेल. आपली जुनी कार्यपद्धती आणि कार्यशैली बदलावी लागेल. प्रत्येक निर्णयासाठी प्रदेश नेत्यांची संमती लागेल, ज्याची सवय बडगुजर यांना आधी नव्हती, ती आता लावून घ्यावी लागेल.
सुधाकर बडगुजर यांचे वैयक्तिक राजकारण मोठे करण्यासाठी भाजपने त्यांना पक्षात प्रवेश दिलेला नाही. भाजपला नाशिक मध्ये 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचेत. त्यासाठी बेरजेचे राजकारण म्हणून बडगुजर यांना पक्षात घेतले आहे. महापालिका निवडणुकीत बडगुजर यांनी ही बेरीज जमवून आणली तर ठीक, अन्यथा भाजप सारख्या सध्याच्या बलाढ्य पक्षात असे किती “बडगुजर” आले आणि किती गेले, याची गिनतीही कुणी करत बसणार नाही.
BJP has given Sudhakar badgujar a big assignment, but it’s fullfilment will decide his fate
महत्वाच्या बातम्या
- Khameneis : खामेनींच्या ‘या’ संदेशानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली
- Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटना- जीव वाचवण्यासाठी जळत्या वसतिगृहातून विद्यार्थी मारत होते उड्या
- Kamal Haasan : …अखेर कमल हसनचा ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकातही होणार प्रदर्शित!
- Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत अखिलेश यादव यांनी केली मोठी घोषणा!