• Download App
    भाजपने लायकी नसताना मोठी पदे दिली, एकनाथ खडसेंचे मानसिक संतूलन बिघडले, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल|BJP gave big posts without merit, Eknath Khadse's mental balance deteriorated, Girish Mahajan's attack

    भाजपने लायकी नसताना मोठी पदे दिली, एकनाथ खडसेंचे मानसिक संतूलन बिघडले, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : एकनाथ खडसे म्हणतात गिरीष महाजन यांना मी मोठे केले, मी मोठे केले पण लायकी नसताना त्यांना भाजप मध्ये खूप पदे मिळाले आहे. एकनाथ खडसे स्वत:ला माशा चावून घेत असल्याने त्याचा उलट परिणाम त्यांच्यावर होत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद केला.BJP gave big posts without merit, Eknath Khadse’s mental balance deteriorated, Girish Mahajan’s attack

    महाजन म्हणाले, एकनाथ खडसे मुक्ताईनगर नगरपालिका, ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाही. त्यांची मुलगी विधानसभेतही पडली असे असेल तर लायकी नसताना त्यांना भाजपमध्ये मोठी पदे दिली गेली तरीही ते अशी भाषा वापरत असतील तर त्यांचे संतूलन बिघडले आहे. प्रकृती आणि खूप सारे आजार त्यांना आहे. त्यामुळे त्यांची अशी मनस्थिती होणे स्वाभाविक आहे.



    जेल मध्ये टाका, सडवून टाका असे म्हणत असतील तर तो विक्षिप्तपणा आहे. स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील खडसेंबद्दल घाण बोलतात पण मी खडसेंसोबत 25 वर्षे राहीलो मला त्यांच्याबद्दल टीका टीप्पणी करायची नाही. आपण त्यांचे अधिक संतूलन बिघडून टाकणे मला योग्य वाटत नाही.

    ‘महाविकास आघाडी सरकार आल्यापासून वीजेच्या समस्या निर्माण झाल्या. समस्या निर्माण करून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि तेच पुसायचे. सहानुभूतीसाठी कोळशा आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. महाविकास आघाडी शेतकरी, उद्योजक आणि सर्व जनतेला छळत आहे. कोळशाअभावी कुठलेही वीज केंद्र बंद नाही. कोळसाचा पुरवठा आणि स्टॉक संपला असे नाही पण ढिसाळ काम सरकार करत आहेत.

    जाणीव पुर्वक वीज केंद्र बंद केले जात आहे. त्यामागील कारण दलाली आहे. वीज टंचाईचे नाटक उभे करायचे त्यातून टक्केवारीचा कार्यक्रम महाविकास आघाडी पुढे नेत आहे. जास्तीत जास्त वीज खरेदी करून दलाली केली जात आहे, असा आरोप महाजन यांनी केला.

    BJP gave big posts without merit, Eknath Khadse’s mental balance deteriorated, Girish Mahajan’s attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस