• Download App
    Dheeraj Ghate भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांच्या नव्या नियुक्त्या आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या. पुणे शहरातील भाजप अध्यक्षपदी धीरज घाटे यांनाच कायम ठेवण्यात आले आहे, तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाची जबाबदारी शत्रुघ्न काटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

    या यादीत एकूण ४० संघटनात्मक जिल्ह्यांतील अध्यक्षांची नावे देण्यात आली असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा चार प्रमुख विभागांतील विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील सिंधुदुर्गसाठी प्रभाकर सावंत, रत्नागिरी उत्तरसाठी सतिष मोरे, तर ठाणे शहरासाठी संदीप लेले यांची निवड करण्यात आली आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहराचे नेतृत्व धीरज घाटे यांच्याकडेच राहणार असून, पिंपरी चिंचवडसाठी शत्रुघ्न काटे, सोलापूर शहरासाठी रोहिणी तडवळकर आणि साताऱ्यासाठी अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



    उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारसाठी निलेश माळी, मालेगावसाठी निलेश कचवे, तर जळगाव शहरासाठी दीपक सूर्यवंशी यांची निवड झाली आहे.

    मराठवाड्यात नांदेडसाठी अमर राजूरकर, परभणीसाठी शिवाजी भरोसे, छत्रपती संभाजीनगर उत्तरसाठी सुभाष शिरसाठ, तर धाराशिवसाठी दत्ता कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

    या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी भाजपने आपली तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट होत आहे.

    BJP district president appointed; Dheeraj Ghate remains in power in Pune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस