विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav-Raj शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे.Uddhav-Raj
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू व मनसेची युती झाली आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे.Uddhav-Raj
काँग्रेसने वंचित सोबत जे केले तेच उद्धव यांनी राजसोबत केले
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी म्हणाले की, आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे. पडेल जागा देत काँग्रेसने मुंबईत वंचितशी आघाडी केली, तर किरकोळ जागा देत उबाठाने मनसेला गुंडाळलं.
सन्मानाच्या नावाखाली बोलावणं, वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारण… ठाकरे ब्रॅन्डच्या घोषणा करण हे सगळं उबाठा ने केलं, पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम ५० जागांवर समाधान मानायला लावलं. यालाच आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंचा 2019 नंतर भाजप विरोध हाच केंद्रबिंदू
केशव उपाध्ये यांनी नुकतीच एका लेखातूनही उद्धव व राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून आजवर एकदाही महाराष्ट्राचा व मुंबईचा विकास करण्यासंदर्भातील आपल्या दृष्टिकोनाचा एकदाही परिचय करून दिलेला नाही. 2019 नंतर त्यांनी आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू भाजपच्या विरोधात स्थिर करताना काँग्रेस, शरद पवार, कम्युनिस्ट, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल अशा राष्ट्रीय राजकारणातील म्होरक्यांबरोबर पाट लावला. उद्धव ठाकरेंना सक्रिय राजकारणात येऊन 25 वर्षे होऊन गेली आहेत. या काळात मुंबई महापालिका ताब्यात ठेवताना आणि अडीच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना उद्धव ठाकरेंना मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणसाच्या कल्याणाचे काहीच देणे-घेणे नाही, हे अनेकदा दिसले आहे, असे ते म्हणाले होते.
ते पुढे म्हणाले होते, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपणच घरातून बाहेर काढलेल्या चुलत-मावस भावाची आठवण झाली. ज्या मनसेची संपलेला पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी हेटाळणी केली होती, त्याच राज ठाकरेंच्या दारात जाण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली. आता मनोमिलनानंतरही ठाकरे बंधू मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, यासारख्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या मुद्यावरच बोलू लागले आहेत. मुंबापुरीचा विस्तार होत असताना मुंबईकरांपुढे दररोजच्या जगण्यातील हजारो प्रश्न तयार झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, याविषयी गांभीर्याने बोलण्याऐवजी ठाकरे बंधू पुन्हा मुंबई, मराठी या भावनात्मक विषयामध्ये मराठी मतदाराला गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
Avala Deun Kohala”: BJP Slams Uddhav-Raj Alliance Over Seat Sharing
महत्वाच्या बातम्या
- Pinaka Guided Rocket : भारताच्या पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी; 120 किमी रेंज, लक्ष्यावर अचूक हल्ला केला
- ऐन निवडणुकीच्या मध्यावर मुंबईत शिंदे सेनेचे मनसेला खिंडार!!
- Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला हल्ल्याची धमकी, पुन्हा अणु कार्यक्रम सुरू करू नका; हमासलाही शस्त्रे सोडण्याचा इशारा
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममता बंगालमध्ये घुसखोरी थांबवू शकत नाहीत, आमचे सरकार आले तर पक्षीही फिरकू शकणार नाही