• Download App
    BJP Ashish Shelar Targets Thackeray Brothers Muslim Duplicate Voters Rohit Pawar ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदारच दिसतात

    Ashish Shelar : ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदारच दिसतात; रोहित पवारांच्या मतदारसंघात 5 हजारांहून अधिक मुस्लिम दुबार मतदार, भाजपचा पलटवार

    Ashish Shelar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Ashish Shelar मविआकडून ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मविआमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात ते जितक्या मतांनी निवडून आले त्या पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. तर ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.Ashish Shelar

    आशिष शेलार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात 5 हजार 532 दुबार मुस्लीम मतदार आहेत, पण आपल्या मतदारसंघात जी मत फायद्याची आहेत त्यावर विरोधकांकडून काही आक्षेप घेतला जात नाही. तिथे रोहित पवार 1 ते दीड हजार मतांनी निवडून आले. तर मुंब्रा मतदारसंघामध्ये 30 हजारांहून अधिक मुस्लीम दुबार मतदार आहेत. नाना पटोले यांच्या मतदारसंघात 400 हून अधिक मुस्लीम दुबार मतदार असून ते केवळ 208 मतांनी निवडून आले म्हणत जिथे आपला फायदा आहे त्या ठिकाणी दुबार मतदारांवर काही न बोलण्याची भूमिका मविआचे नेते घेत असल्याचा आरोप शेलारांनी केली आहे. वरुण सरदेसाई जिंकले 11,365 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत.Ashish Shelar



    आम्हाला मतदारांमध्ये भेद करायचा नाही

    आशिष शेलार म्हणाले की,आम्हाला मतदारांमध्ये भेद करण्याची इच्छा नाही. पण जे मतदारांमध्ये भेद करत आहे त्यांना उघडे पाडण्याचे काम आम्ही करत आहोत. जे दिसतंय ते लोकांसमोर आले पाहिजे म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भूमिका पाहिली तर ते मतदार यंत्र, मतदान यादी, निवडणूक आयोग, निकाल याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे हा सर्व फेक नरेटिव्ह तयार केला जात आहे. जनता यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.

    ठाकरेंची भूमिका हिंदू विरोधी

    आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरेंनी जे मतदारसंघ सांगितले त्यामध्ये केवळ त्यांना भोईर, पाटील असेच आडनावे दिसून आली. राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये केवळ मराठी माणूसच दिसला का? दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का? बडवायची भाषा मराठी, दलित आणि हिंदू मतदारांसाठी वापरत आहात. उद्धव ठाकरेंची भूमिका ही भूमिपुत्रांच्या विरोधातील दिसून येत आहे. राज ठाकरे यांना भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही.

    मतदार यादीमध्ये 8 प्रकारे घोळ

    आशिष शेलार म्हणाले की, कर्जत-जामखेड, इस्लामपूर, मुंब्रा, साकोली, उत्तम जानकर यांचा मतदारसंघामध्ये नाव एकसारखे आणि नंबर वेगळे आहेत. काही ठिकाणी नाव सारखे आहेत तर नाव एकसारखे आणि मतदार यादीतील नंबर दुसरा आहे. काही ठिकाणी नाव सारखे आहे तर लिंग वेगळे आहे. काही ठिकाणी पत्ते वेगळे दिले आहेत. काही ठिकाणी नाव वेगळे आहेत. तर काही ठिकाणी वडीलांचे नाव नाही, नावात अदलाबदल करण्यात आली आहे, शेख, अन्सारी यांचे दुबार मतदार चालतात कारण ते सोयीचे आहे.

    लोक सभेवेळी मविआकडून ‘व्होट-जिहाद’

    आशिष शेलार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली गेली आणि हे पाप महा विकास आघाडीने केले. हा एक सुनियोजित ‘व्होट-जिहाद’ होता. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता. हिंदू दुबार मतदारांवरून आरोप करताना मविआ आणि राज ठाकरे यांच्याकडून मुस्लिक, अल्पसंख्याक मतदारांवर मौन बाळगले जात आहे.

    BJP Ashish Shelar Targets Thackeray Brothers Muslim Duplicate Voters Rohit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    विलासराव ते फडणवीस; अजित पवार हे कुठल्याही मुख्यमंत्र्यांसाठी राजकीय डोकेदुखीच, पण आता पार्थच्या मदतीला आत्या धावली!!

    एकनाथ खडसे यांचाच “न्याय” अजित पवारांना लावणार का??; फडणवीस सरकार समोर नेमका पेच!!; अजितदादांचा राजीनामा कधी??

    अजितदादांच्या मुलाचा जमीन खरेदी घोटाळा फडणवीसांच्या चौकशीच्या स्कॅनर खाली, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून मागविली माहिती