विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेसने चक्क भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.BJP announces candidature for BJP corporator for Assembly, Kolhapur North constituency
जयश्री जाधव या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. भाजपकडून सत्यजित शिवाजीराव कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते देखील सध्या विद्यमान नगरसेवक आहेत.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्या वर्षी निधन झालं होतं. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील होता.
पण भाजपने निवडणुकीत उमेदवार उतरवला आहे.सत्यजित कदम हे 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढले होते. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत भाजपच्या नगरसेविकेला काँग्रेसने तर काँग्रेसच्या 2014 च्या विधानसभेच्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट असा उल्टा पुल्टा झाला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 24 मार्च ही शेवटची तारीख आहे.
BJP announces candidature for BJP corporator for Assembly, Kolhapur North constituency
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क, द काश्मीर फाईल्स चित्रपटाशी दहशतवाद्यांचे कनेक्शन
- अमनोरा येथे होळीच्या पार्टीत २१ मोबाईल चोरीला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- India – Japan – Kishida – Modi : भारतावरचा विश्वास वाढला; जपानची भारतात 3.2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा!!
- आसनी’ चक्रीवादळामुळे काही ठिकाणी वादळ, पाऊस
- NCP – MIM Alliance : राष्ट्रवादीला आघाडीसाठी फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी!!; नितेश राणेंचा टोला