क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्या समोर धरणे आंदोलनाचा इशारा उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिला होता.BJP activists arrested along with Mumbai MP Gopal Shetty
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा कांदिवली पूर्व येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आज दि, २८ डिसेंबर दुपारपर्यंत कायदेशीर परवानगी द्यावी,अन्यथा क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्या समोर धरणे आंदोलनाचा इशारा उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिला होता.
दरम्यान क्रीडा मंत्री सुनील केदार भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची परवानगी नाकारली त्यामुळे सुनील केदार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी निघालेले उत्तर मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
गोपळ शेट्टी यांच्या सह भाजपा कऱ्यकर्यांना देखील अटक केली.यावेळी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांना आझाद नगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
BJP activists arrested along with Mumbai MP Gopal Shetty
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती तर ठाकरे सरकार पडले असते, नाना पटोले यांचे वक्तव्य
- WATCH : एफआयआरनंतरही कालिचरण महाराज म्हणाले, मला पश्चाताप नाही, फाशी दिली तरी मान्य; गोडसेंना माझा प्रणामच!
- मुख्यमंत्री दाखवा, हजार रुपये मिळवा; महाविकास आघाडी अपयशी – सदाभाऊ खोत यांची टीका
- नाताळ सुट्टीत सिक्कीममध्ये आलेले शेकडो पर्यटक अडकले चीन सीमेजवळ