पुन्हा एकदा खाकी बदनाम झाली आहे, जालना पोलिसांनी एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे भाजपा युवा मोर्चाचे अधिकारी आहेत, त्यांचे नाव शिवराज नरियावाले असे आहे.
जालन्यात लाचखोर डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षकाने भाजप कार्यकर्त्याला केलेल्या बेदम मारहाण प्रकणाची चौकशी होणार आहे.
औरंगाबाद रेंजचे आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. BJP activist beaten by police at Jalna hospital; Third Degree-Khaki re-infamous; Video viral
विशेष प्रतिनिधी
जालना : जालन्यात लाचखोरीत अडकलेल्या डीवायएसपी आणि एका पोलीस निरीक्षकाकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण झालीय. या मारहानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वी अट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २ लाखांची लाच घेणारे निलंबित डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पोलीसांचा दावा
जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे.
सत्य काय?
पीडित भाजप जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांनी आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्यामुळे मारल्याचे म्हटलंय. संबंधित तोडफोडीचा आपला काहीही संबंध नसून आपण रुग्णालयाच्या आवारात पोलीस माझ्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीला शिवीगाळ करत असतानाचे पाहिले होते. तीच पोलिसांची शिवीगाळ मोबाईलमध्ये रेकॉर्डिग केल्यामुळे पोलिसांनी मारहाण केल्याचं म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
९ एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातील दीपक रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात काचा फोडून धुडगूस घातल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात ३ ते ४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या दिवशी पोलिसांनी दीपक हॉस्पिटलमधील आयसीयूची शिवराज नारियलवाले यांनी तोडफोड केली म्हणून मारहाण केली असल्याचा खुलासा कदीम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केलाय.
काही अनुत्तरित प्रश्न-
पोलिसांच्या दाव्यानुसार रुग्णालयात तोडफोड केल्याने मारहाण केल्याचे सांगितले असले तरी या प्रकरणी अद्याप कोणाला आजवर अटक का झाली नाही हा प्रश्नच अनुत्तरित आहे, पीडित कार्यकर्त्याने पोलिसांनी आपल्याला घटनेच्या दिवशी रात्रभर ठेऊन दुसऱ्या दिवशी दुपारी सोडून दिल्याचं म्हटलंय. मग पोलीसांनी दीड महिन्यापूर्वी गुन्हा दाखल केलेले ते ३-४ अज्ञात आरोपी आजवर मोकाट सोडलेच कसे हे कोडच आहे.
आज या घटनेला दीड महिना उलटून गेलाय. पीडित व्यक्तीचे FIR मध्ये नाव नाही. मग पोलीस सांगत असलेले मारहाणीचे कारण किती सत्य आहे हा प्रश्नच आहे. घटनेला दीड महिना उलटल्यानंतर हा व्हिडिओ वायरल कसा झाला हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र, त्याहून गंभीर म्हणजे बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीला एवढ्या पोलिसांनी अशा पद्धतीने केलेली मारहाण खाकीची इभ्रत मातीत घालत आहे.
खिरडकर यांनी अपशब्द वापरत गवळी समाजाबद्दल आक्षेपाहार्य भाषा वापरली होती. तेव्हा हा सगळा प्रकार सदर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याने मोबाईलमध्ये कैद केला होता.
BJP activist beaten by police at Jalna hospital; Third Degree-Khaki re-infamous; Video viral
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे निर्माते आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बनवणार चित्रपट, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन
- RBI ने म्हटले- आर्थिक वर्ष 2021 मध्ये 2000च्या नोटाची छपाई नाही, नोटबंदीनंतर 500 च्या नोटा चलनात सर्वाधिक
- परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौरा, जयशंकर म्हणाले- कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारत आणि अमेरिकेच्या मजबूत भागीदारीची आवश्यकता
- पंतप्रधान मोदींचा ओडिशा-बंगालमधील ‘यास’ चक्रीवादळ बाधित भागाचा दौरा, आढावा बैठकीत ममतांचाही सहभाग
- भारताला सोपवण्याएवेजी फरार मेहुल चौकसीला अँटिग्वाला परत देणार डोमिनिका सरकार