- भागवत कराड, भारती पवारांकडे उत्तर महाराष्ट्र प्रभारीपद
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर सर्व पक्ष राजकीय घमासान करत असताना भाजप मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी घट्ट करण्याच्या दृष्टीने दमदार पावले टाकत आहे. यासाठी भाजपने देशाबरोबरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष केंद्रित केले असून थेट केंद्रीय मंत्री संघटनात्मक बांधणीच्या कामासाठी उतरवले आहेत. bjp 2024 Gadkari’s monthly travel to Vidarbha, Rane, Danve’s to South Maharashtra
प्रत्येक केंद्रीय मंत्र्याकडे लोकसभा निवडणूक 2024 होईपर्यंत विशिष्ट मतदारसंघांच्या प्रत्येक महिन्याच्या प्रवासाची निश्चित स्वरूपाची जबाबदारी दिली आहे. याचा अर्थ हे केंद्रीय मंत्री किमान 18 महिने संबंधित लोकसभा मतदार संघात नियमित प्रवास करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरी यांच्यापासून भारती पवार यांच्यापर्यंत सर्व केंद्रीय मंत्र्यांचा प्रवासाचा तपशील पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.
या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने लोकसभा प्रवास योजना आखली आहे.
स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार
भाजप केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजना राज्यात आजपासून सुरू झाली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रवास करत आहेत. त्याच पद्धतीने राज्यातील अन्य १७ लोकसभा मतदारसंघात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम होईल. राज्याच्या लोकसभा प्रवास योजनेचे मुख्य संयोजक किशोर काळकर आहेत, केंद्रीय लोकसभा प्रवास योजनेचे प्रभारी माजी मंत्री बाळा भेगडे आहेत. राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी एक स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार आहे. त्याची जबाबदारी आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
कोणाकडे कुठली जबाबदारी?
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील.
- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल.
- नारायण राणे (सांगली), रावसाहेब दानवे (लातूर व मावळ), डॉ. भागवत कराड (परभणी व धुळे), डॉ. भारती पवार (नाशिक) आणि कपिल पाटील (रावेर आणि सोलापूर) अशी जबाबदारी असेल.
- हे केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा प्रवास करतील. त्यामध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि सार्वजनिक स्वरुपाचे मोठे कार्यक्रम यशस्वी करणे या कामांचा समावेश असेल
- प्रदेश सरचिटणीसपदी विजय चौधरी
- भाजपाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली.
- महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र कोणकोणत्या विभागात मागे पडला, यावर श्वेत पत्रिका काढावी. प्रत्येक विभागाचा अहवाल मांडला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पळता भुई थोडी होईल, असे ते म्हणाले.
bjp 2024 Gadkari’s monthly travel to Vidarbha, Rane, Danve’s to South Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंना घरातलीच महिला मुख्यमंत्री करायचीय, नवनीत राणांचा टोला; पण मराठी माध्यमांनी लावली तिघींमध्ये स्पर्धा!!
- शिवशक्ती – भीमशक्ती – लहूशक्ती एकत्र; पण उद्धव ठाकरे यांच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण?
- अमित शाह, राजनाथ सिंह, फडणवीसांची पावले समान नागरी कायद्याच्या दिशेने
- धान्यापासून दारू ते ताडी वर बंदी नको, व्हाया सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री; एक पुरोगामी प्रवास
- पुणे, सातारा, कोल्हापूरात नोकरीची संधी; 7500 रिक्त पदांसाठी भरती; वाचा तपशील