विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेच्या निवडणुका आज झाल्या तर शिवसेना-भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेलच, पण महाविकास आघाडी टिकली तरी ती बहुमत गाठणार नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे नुकसानच होईल, असा निष्कर्ष न्यूज एरिना इंडिया या वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आला आहे. BJP 100+ for consecutive third time, consolidating like old Congress in maharashtra
पण त्या पलीकडे जाऊन या सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य असे की, भाजप आतापर्यंतची सर्व रेकॉर्ड मोडून सव्वाशेच्या पार आकडा गाठणार आहे, तर बाळासाहेबांचे नाव घेणाऱ्या त्यांच्या दोन्ही शिवसेनांच्या अनुयायांचे मात्र आपापसात भांडून प्रचंड नुकसान होत असल्याचे आकडेवारी सांगत आहे.
न्यूज एरिना इंडियाच्या या सर्वेक्षणात भाजपला 125 ते 129 जागी विजय मिळवण्याचे भाकीत वर्तविले आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 25 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 19 जागा मिळत आहेत आणि हेच आपापसांतल्या भांडणातून बाळासाहेबांच्या अनुयायांचे नुकसान आहे.
बाकी राष्ट्रवादी काँग्रेस 55 वर आटोपत आहे. यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या भरपूर भाकऱ्या फिरवल्या तरी त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही हेच यातून दिसत आहे, तर त्यातल्या त्यात महाविकास आघाडीचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना यांच्यापेक्षा काँग्रेसला होताना दिसत असून काँग्रेसची टॅली चाळिशीच्या घरातून पन्नाशीच्या घरात जात आहे. पण तिन्ही पक्ष मिळून बहुमताचा आकडा गाठू शकत नाहीत ,ही वस्तुस्थिती या सर्वेक्षणाने स्पष्ट केली आहे.
त्या उलट भाजप सलग तिसऱ्यांदा ट्रिपल डिजिट अर्थात शंभरी ओलांडून पलीकडे सरकत आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांचा संकोच होऊन भाजपच्या रूपाने जुन्या काँग्रेस सारखाच बळकट राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रात पाय रोवून स्थिर होतो आहे, हे या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
BJP 100+ for consecutive third time, consolidating like old Congress in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!