विशेष प्रतिनिधी
मुरगूड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात ५५१ वी रँक मिळवणारा यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे याचे मूळगाव यमगेमध्ये प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. बिरदेवच्या यशाने भारावून गेलेल्या ग्रामस्थांनी मुरगूडपासून यमगेपर्यंत जंगी मिरवणूक काढली. बीरदेवच्या कौतुकासाठी जनसागर लोटला होता. Birdev Done IPS
शिवतीर्थपासून सकाळी आठ वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल सहा तास चालली. बिरदेव यांच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बिरदेव व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.यूपीएससी परीक्षेचा निकाल २२ एप्रिलला दुपारी लागला. त्या दिवशी बिरदेव बेळगावजवळील भवानीनगर येथे माळावर आपल्या मामाच्या बकऱ्यांत रमला होता. गावकऱ्यांनी फोनवरून बिरदेवचे कौतुक करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी बिरदेवच्या स्वागताची तयारी सुरू केली
पण बिरदेवने सैन्यात असलेला भाऊ वासुदेव येत नाही, तोपर्यंत गावात येणार नसल्याची इच्छा व्यक्त केली आणि रविवारी बिरदेव भावासह गावात आला आणि ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.सकाळी बिरदेव कर्नाटकातील झोडकूरळी या आपल्या बहिणीच्या गावाहून मुरगूडमधील शिवतीर्थ येथे दाखल झाला. प्रारंभी औक्षण केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये बिरदेव आपले आई बाळाबाई, वडील सिद्धाप्पा, भाऊ, बिरदेव, बहीण व अन्य नातेवाईक होते. मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती.
ही मिरवणूक यमगे एसटी स्टँड येथे आली. यमगेच्या प्रवेशद्वारात जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अंबाबाई, डोमरीन व बिरोबा मंदिरांचे दर्शन घेऊन बिरदेवच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. बिरदेवच्या कौतुकासाठी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.भावासाठी मिरवणूक थांबवलीबिरदेव आपल्या आई-वडील व अन्य नातेवाइकांसह मिरवणुकीसाठी सजवलेल्या जीपमध्ये चढला.
Birdev Done IPS : Upsc exam 551 rank
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम मध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या; तरीही लिबरल पुरोगाम्यांकडून काश्मिरियत आणि मुस्लिमांच्या मदतकार्याची जास्त चर्चा!!
- Ukrainian : युक्रेनच्या राजधानीवर 9 महिन्यांतील सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला; रशियन हल्ल्यात 8 जण ठार, 70 जखमी
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर: कठुआमध्ये ४ संशयित आढळले, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम