विशेष प्रतिनिधी
पुणे : बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जावादे हे मराठी मनोरंजन विश्वातील सध्या हिट कपल आहे. बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या पर्वात बिग बॉसच्या घरात या दोघांचे सूर जुळले . आणि बाहेर आल्यावर त्या दोघांनी आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. Bigg Boss Fame Amrita and Prasad NEWS
त्यानंतर या जोडीला नेटकरांकडून चांगलीच पसंती मिळते. प्रसाद आणि अमृता कायमच आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ही जोडी लवकरच आता लग्न बंधनात अडकणार असून , या जोडीची केळवणही सुरू झाली आहेत .तत्पुर्वी या दोघांच्या मित्रमैत्रीणी त्यांना केळवण देत आहेत. काहीच दिवसांपुर्वी रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमने या दोघांना केळवण दिलं. त्यावेळी अमृताने प्रसादसाठी घेतलेला सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालाय.
अमृताने प्रसादसाठी घेतलेला खास उखाणाअमृताने प्रसादसाठी घेतलेल्या खास उखाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत अमृताच्या बाजुला प्रसाद बसलेला दिसत असुन संपूर्ण रंग माझा वेगळा मालिकेची टीम दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अमृता उखाणा घेताना म्हणते, “गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा, प्रसादचं नाव घेते विथ टीम रंग माझा वेगळा.” असा भन्नाट उखाणा अमृताने घेतला. अमृताने उखाणा घेताच रंग माझा वेगळा मालिकेची टीमने टाळ्या वाजवुन एकच जल्लोष केला.
Bigg Boss Fame Amrita and Prasad NEWS
महत्वाच्या बातम्या
- Good News – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘या’ कालावधीत असणार टोल माफी!
- तैवानवर कब्जा करणार चीन, ब्लू प्रिंट केली जाहीर; लोकांना व्यवसायासाठी दाखवले आमिष
- महाराष्ट्र-मध्य प्रदेशमध्ये रेड अलर्ट, हिमाचल-उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा इशारा!
- जम्मू-काश्मीर : अनंतनागमधील दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद, लष्कराची शोध मोहीम सुरूच!