अभिजित बिचुकलेच्या जागी राखी सावंत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे.दरम्यान याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.Bigg Boss 15: Abhijit Bichukale Corona Infection Before Entry
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘बिग बॉस १५’ मध्ये अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री होणार होती. बिचुकले ‘बिग बॉस १५’ मध्ये काय राडा घालतो, हे पाहायला चाहते उत्सुक होते. बिचुकलेसोबत रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी या दोघीही ‘बिग बॉस १५’ मध्ये एन्ट्री घेणार होत्या. पण आता ही एन्ट्री लांबली आहे.याच कारण म्हणजे ‘बिग बॉस १५’ मध्ये एन्ट्री घेण्याआधीच बिचुकलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
आधीच टीआरपीच्या शर्यतीत ‘बिग बॉस १५’ पिछाडला आहे. अशात टीआरपी वाढवण्यासाठी मेकर्स वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. वाईल्ड कार्ड एन्ट्री याचाच भाग आहे.अभिजीत बिचुकलेची वाईल्ड कार्ड एन्ट्री ऐनवेळी रद्द झाल्यानं आता त्याच्याजागी राखी सावंत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे.दरम्यान याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.
राखी सावंतने एक पोस्ट शेअर करत बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याचे संकेत दिले आहेत.तसेच बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेद हिनेही राखीची एन्ट्री कन्फर्म केली आहे. तिने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.या स्टरीमध्ये उर्फी जावेदने राखी सावंत बिग बॉसमध्ये वाइर्ल्ड कार्ड एन्ट्री करतेय, आता मजा येणार, असं तिने लिहिलं आहे.
Bigg Boss 15: Abhijit Bichukale Corona Infection Before Entry
महत्त्वाच्या बातम्या
- जिनांच्या अनुयायांनी ऊसाच्या गोडीत कडूपणा मिसळला, योगी आदित्यनाथ यांचा आरोप
- सुशांतसिंगच्या हत्येत आदित्य ठाकरे यांचा सहभाग, पुरावे देऊनही अटकेची कारवाई झाली नसल्याचा नारायण राणे यांचा आरोप
- सिध्दूंचा कॉँग्रेसला ताप थांबेना,अमरिंदर सिंग यांना घालविल्यावर आता चरणजीतसिंग चन्नींवर निशाणा, आपल्याच सरकारविरुध्द करणार उपोषण आंदोलन
- AMBANI REACHEST PERSON : 24 तासाच्या आत फासा पलटला ! ‘तो’ ताज पुन्हा अंबानींच्या डोक्यावर