प्रतिनिधी
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी काल मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले.Big relief from the state government to the victims of heavy rains help in the limit of three hectares instead of two; It will help twice as much as NDRF
गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Big relief from the state government to the victims of heavy rains help in the limit of three hectares instead of two; It will help twice as much as NDRF
महत्वाच्या बातम्या
- हर घर तिरंगा मोहिमेवर वरुण गांधींचे सरकारवर टीकास्त्र ; म्हणाले- तिरंग्याच्या किमतीवर गरिबांच्या तोंडचा घास हिरावणे लज्जास्पद
- जगात शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव : मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले- युद्ध रोखण्यासाठी आयोग बनवावा, यात पोप फ्रान्सिसही असावेत
- पावसाळी अधिवेशनात सहा दिवस कामकाज, अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात
- Azadi Ka Amrit Mahostav : स्वतंत्र भारताला अर्थमंत्री आणि कायदे पंडित शिक्षणमंत्री देणारे लोकमान्य टिळक!!