• Download App
    Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून

    Kunal Kamra : कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

    Kunal Kamra

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदामुळे कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : Kunal Kamra मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदामुळे कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.Kunal Kamra

    तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील वानूर येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या समाधानासाठी जामीन सादर करावा लागेल या अटीवर न्यायालयाने कामराला दिलासा दिला. न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी दुसऱ्या प्रतिवादीला (खार पोलिस) नोटीस बजावली आणि प्रकरणाची सुनावणी ७ एप्रिल रोजी ठेवली.



    कामराने माहिती दिली आहे की ते २०२१ मध्ये मुंबईहून तामिळनाडूला गेले होते आणि तेव्हापासून ते त्याच राज्यातील रहिवासी आहेत आणि त्यांना मुंबई पोलिसांकडून अटक होण्याची भीती आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता, त्यानंतर कामरा अडचणीत सापडले आहेतं.

    Big relief for Kunal Kamra from Madras High Court interim bail granted

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha Reservation, : मराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी; 2 आरक्षणातील कोणते ठेवणार? न्यायालयाचा प्रश्न; पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला

    मविप्र विद्यापीठाबद्दल संभ्रम; पण तो खुद्द शरद पवारांनी तयार केला की त्यांच्या अनुयायांनी??

    Panipatkar Vishwas Patil : सातारमध्ये होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांची निवड