करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही सुपरस्प्रेडर असण्याची शक्यता देखीव वर्तवली जात आहे. करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करण्याचे आदेशही BMC नं दिले आहेत. BIG NEWS! The result of a Bollywood party; Kareena Kapoor – Amrita Arora infected with corona; Fear of being a superspreader; Home seal from BMC
विशेष प्रतिनिधी
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा दोघींना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. करीना कपूरचं घर सील करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करीना आणि अमृता या दोघी अनेक कार्यक्रम आणि पार्टीत सहभागी झाल्या होत्या.
या दरम्यान दोघींकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालनझालं नसल्याचं BMC च्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. करीना आणि अमृताच्या संपर्कात कोण-कोण आलं आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेली माहिती अशी की, करीना आणि अमृताची शनिवारी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दोघींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दोन्ही अभिनेत्रींची घरं सील करण्यात आले असून दोघींना आपापल्या घरात होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
BIG NEWS! The result of a Bollywood party; Kareena Kapoor – Amrita Arora infected with corona; Fear of being a superspreader; Home seal from BMC
महत्त्वाच्या बातम्या
- २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
- उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक ;माळेगाव कारखान्याचा दिवाणी न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला
- ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे अमेरिकेत बूस्टर डोससाठी नागरिकांच्या रांगा
- नागालँड-आसाम सीमेवर तणावपूर्ण शांतता; ओटिंगच्या गोळीबाराचे ख्रिसमस, हॉर्नबिलवर सावट