सीबीआयने NSEचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना शुक्रवारी चेन्नई येथून अटक केली आहे. सीबीआयने गेल्या आठवड्यातच सुब्रमण्यम यांची चौकशी केली होती. एका स्टॉक ब्रोकरने अनियमिततेचे आरोप केले होते, त्या संदर्भात सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांची चौकशी केली होती.Big News Former NSE Group Operating Officer Anand Subramaniam was arrested by CBI and appointed on the advice of an unknown person!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीबीआयने NSEचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना शुक्रवारी चेन्नई येथून अटक केली आहे. सीबीआयने गेल्या आठवड्यातच सुब्रमण्यम यांची चौकशी केली होती. एका स्टॉक ब्रोकरने अनियमिततेचे आरोप केले होते, त्या संदर्भात सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांची चौकशी केली होती.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, सुब्रमण्यम यांची चेन्नईत सीबीआय अधिकाऱ्यांनी तीन दिवस चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून NSE च्या ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसरवर नेमणूक कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचीही चौकशी करण्यात आली होती.
नुकत्याच आलेल्या सेबीच्या अहवालात एनएसईच्या कारभारातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर सुब्रमण्यम प्रकरणाच्या चौकशीचा विस्तार करण्यात आला. सीबीआयने 11 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या सेबीच्या अहवालातून काही “नवीन तथ्यां” संदर्भात एनएसईचे माजी सीईओ चित्रा आणि रवी नारायण यांचीदेखील चौकशी केली होती.
सेबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चित्रा अज्ञात योगींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत असत आणि त्यांच्या सांगण्यावरून सुब्रमण्यम यांना सल्लागार आणि समूह संचालन अधिकारी बनवले होते. हा व्यवसायाचा गंभीर भंग असल्याचे लक्षात घेऊन चित्रा यांच्यावर ३ कोटी आणि सुब्रमण्यम यांना २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Big News Former NSE Group Operating Officer Anand Subramaniam was arrested by CBI and appointed on the advice of an unknown person!
महत्त्वाच्या बातम्या
- ED – IT raids : ईडी – आयटीच्या कारवाया; शिवसेना – राष्ट्रवादी नेत्यांच्या तोफा; पण मोदी – शहा “तोंडी” प्रत्युत्तर का देत नाहीत…??
- कालच्या घसरगुंडीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 55,700च्या वर, निफ्टीने 16,600 ची पातळी ओलांडली
- Russia-Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धावर भारताच्या भूमिकेवर अमेरिकेने प्रथमच वक्तव्य, काय म्हणाले बायडेन? वाचा सविस्तर…
- बंदी घातलेल्या नोटा बदलून देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आरबीआयला आदेश
- युक्रेनचा दावा – ८०० हून अधिक रशियन सैनिक ठार, ३० टँक आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट