• Download App
    मोठी बातमी : बदली आदेश उलटवण्यासाठी 10 पोलीस अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख, अनिल परब यांना 40 कोटी दिले, सचिन वाझेचा ईडीला जबाब । Big News 10 DCPs paid Rs 40 crore to Anil Deshmukh, Anil Parab to reverse transfer order, Sachin Vaze tells ED

    मोठी बातमी : बदली आदेश उलटवण्यासाठी 10 पोलीस अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख, अनिल परब यांना 40 कोटी दिले, सचिन वाझेचा ईडीला जबाब

    Anil Deshmukh : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचे तत्कालीन कॅबिनेट सहकारी अनिल देशमुख यांनी मुंबईतील 10 डीसीपींकडून तत्कालीन शहर पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी जारी केलेल्या बदलीच्या आदेशाला उलटवण्यासाठी 40 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. ‘द फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार हा आरोप बरखास्त पोलीस अधिकारी सचिन वाझेने अंमलबजावणी संचालनालयाकडे दिलेल्या जबाबात केला आहे. Big News 10 DCPs paid Rs 40 crore to Anil Deshmukh, Anil Parab to reverse transfer order, Sachin Vaze tells ED


    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचे तत्कालीन कॅबिनेट सहकारी अनिल देशमुख यांनी मुंबईतील 10 डीसीपींकडून तत्कालीन शहर पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी जारी केलेल्या बदलीच्या आदेशाला उलटवण्यासाठी 40 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. ‘द फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार हा आरोप बरखास्त पोलीस अधिकारी सचिन वाझेने अंमलबजावणी संचालनालयाकडे दिलेल्या जबाबात केला आहे.

    हे वक्तव्य मनी लाँडरिंगप्रकरणी देशमुख यांचे माजी खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्राचा भाग आहे.

    जुलै 2020 मध्ये परमबीर सिंह यांनी मुंबईतील 10 डीसीपींच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. सचिन वाजे यांनी त्यांच्या जबाबत दावा केला होता की, त्यावेळी गृहमंत्रिपदावर असलेले देशमुख हे परमबीर सिंह यांनी दिलेल्या बदलीच्या आदेशाने खुश नव्हते.

    “नंतर मला कळले की बदली आदेशात नोंद असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून 40 कोटी रुपये गोळा करण्यात आले. त्यापैकी प्रत्येकी 20 कोटी रुपये अनिल देशमुख आणि अनिल परब यांना देण्यात आले.”

    पलांडे आणि शिंदे या अटक केलेल्या जोडगोळीशिवाय – मनी लाँडरिंग प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात वाजे यांचीही आरोपी म्हणून नावे आहेत. तथापि, आरोपपत्रात देशमुख, राष्ट्रवादीचे नेते किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आरोपी म्हणून नाहीत. याप्रकरणी पालांडे आणि शिंदे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या एसयूव्ही आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील माजी सहायक पोलीस निरीक्षक वाजेला या वर्षी मार्चमध्ये अटक करण्यात आली होती.

    आरोपपत्रात म्हटले आहे की, मनी लाँड्रिंग प्रकरणात पलांडे आणि शिंदे यांची प्रमुख भूमिका होती. केंद्रीय तपास संस्थेने सांगितले की, त्यांच्या तपासात असे उघड झाले आहे की देशमुख बार आणि रेस्टॉरंट्समधून गोळा केलेले पैसे सुपूर्द करण्याबद्दल वाजे यांना फोन करायचे. उदाहरणार्थ, जानेवारी ते फेब्रुवारी 2021 दरम्यान वाजे यांनी 4.6 कोटी रुपये असलेल्या 16 पिशव्या शिंदे यांच्याकडे दिल्या, तर पलांडे यांनी त्यांच्या सूचना वाजे यांना दिल्या.

    सीबीआयने 21 एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरोधात चौकशी सुरू केली होती. परमबीर सिंह यांना या वर्षी मार्चमध्ये मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आले होते, तर देशमुख यांनी एप्रिलमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

    Big News 10 DCPs paid Rs 40 crore to Anil Deshmukh, Anil Parab to reverse transfer order, Sachin Vaze tells ED

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य