• Download App
    राज्यावर लोडशेडिंगचे मोठे संकट? : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम होण्याची शक्यता । Big crisis of load shedding in the state? : Power strike likely to result

    राज्यावर लोडशेडिंगचे मोठे संकट? : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था

    नागपूर : वेगवेगळ्या मांगण्यासाठी राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यावर लोडशेडिंगचे मोठे संकट येऊन उभे ठाकले आहे.  Big crisis of load shedding in the state? : Power strike likely to result

    कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेल्याने कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे लोडशेडिंग करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी व कामगार दोन दिवसीय म्हणजे २८ आणि २९ मार्च रोजी संपावर गेले आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपात कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेली आहे. त्यामुळे दोन दिवस कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. या संपामुळे देशपातळीवर वीजनिर्मिती प्रभावित होणार आहे.



    नाशिक व भुसावळ येथील वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. तसंच, कोराडी, खापरखेडा व चंद्रपूरचे वीज निर्मिती संच देखील प्रभावित होणार आहे. त्यामुळे राज्यात ४८ तासानंतर लोडशेडिंगची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने केला मेस्मा कायदा लागू दरम्यान,  वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात मेस्मा कायदा लागू केला असून हा प्रस्तावित संप करण्यास मनाई केली आहे.

    Big crisis of load shedding in the state? : Power strike likely to result

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !